Pune Property Tax | आगामी आर्थिक वर्षात पुणेकरांवर कुठलीही करवाढ नाही | महापालिका प्रशासनाचा निर्णय

Homeadministrative

Pune Property Tax | आगामी आर्थिक वर्षात पुणेकरांवर कुठलीही करवाढ नाही | महापालिका प्रशासनाचा निर्णय

Ganesh Kumar Mule Jan 29, 2025 9:16 PM

Pune Property tax | शहरातील TOP 100 थकबाकीदार मिळकत धारकांची ३३४ कोटी थकबाकी!
PMC 32 Villages property tax | ३२ समाविष्ट गावातील नागरिकांना दिलासा | मात्र महापालिकेला हक्काच्या उत्पन्नावर सोडावे लागणार पाणी | विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय
Pune Properties Survey | | PT 3 Application |  नागरिकांचा विरोध सहन करूनही सव्वा तीन लाख मिळकतींचा सर्व्हे!  | १४ ऑगस्ट पर्यंत सर्व्हे संपवणार

Pune Property Tax | आगामी आर्थिक वर्षात पुणेकरांवर कुठलीही करवाढ नाही | महापालिका प्रशासनाचा निर्णय!

 

PMC Property Tax Department –  (The Karbhari News Service) – आगामी आर्थिक वर्ष म्हणजे २०२५-२६ सालात पुणेकरांवर कुठलीही करवाढ नसणार आहे. कराचे दर जैसे थे च असणार आहेत. महापालिका प्रशासनाने नागरिकांना दिलासा देत हा प्रस्ताव स्थायी समिती समोर ठेवला आहे. असे असले तरी मात्र प्रस्तावात खूप चुका आढळून आल्या आहेत. यावर प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक आहे. (Pune Municipal Corporation property tax Department)

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम १२७ नुसार म. न. पा. हद्दीतील सर्व मिळकतींवर मिळकतकर बसविला जातो. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम १९ अन्वये पुढील सरकारी वर्षात ज्या दरांनी व ज्या मर्यादेपर्यंत बसविण्यात येतील ते दर प्रतिवर्षी २० फेब्रुवारीच्या आत  मुख्य सभेची मान्यता घेणे बंधनकारक आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ६३ व ६६ प्रमाणे महानगरपालिकेस शहरामध्येविविध कामासाठी आर्थिक तरतूद करावी लागते. (Pune PMC News)

महानगरपालिकेच्या उपलब्ध आर्थिक स्त्रोतांचा विचार करून अत्यावश्यक खर्च त्याचप्रमाणे प्रकल्पीय म्हणजेच भांडवली खर्च यांचे नियोजन करून चालू आर्थिक वर्षाचे उत्पन्न खर्च यांचा अभ्यास करून पुढील आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक तयार करतांना आगामी वर्षासाठी करावा लागणारा खर्च व त्यासाठी अपेक्षित उत्पन्न यांची सांगड घालणे अत्यावश्यक असते. वाढणाऱ्या दराचा विचार करून, घनकचरा त्याचप्रमाणे वार्डनिहाय अंतर्गत सूचनांचा, खर्च व व्यवस्थापन, पाणीपुरवठा व मलनिःसारण खात्याकडून करण्यात येत असलेल्या मोठ्या प्रमाणातील विकास कामांमुळे सेवासुविधांबाबत झालेला खर्च व त्या अंतर्गत करापोटी करण्यात येणारी मागणी विचारात घेऊन सन २०२५-२६ या वर्षासाठी मिळकतकराचे दर  समाविष्ट करण्यात आले आहेत. मात्र हे दर जैसे थे च ठेवण्यात आले आहेत.

मुदतीत म्हणजे ०१ एप्रिल २०२५ ते ३१ मे २०२६ अखेर मिळकतीचा संपूर्ण मिळकतीचा संपूर्ण कर भरणाऱ्या मिळकतदारांना देण्यात येणाऱ्या ५% अथवा १०% सवलती तसेच गांडूळ खत प्रकल्प, सोलर सिस्टीम व रेनवॉटर हार्वेस्टिंग या योजना राबविण्यात येणाऱ्या मिळकतदारांना देण्यात येणाऱ्या सवलतीबाबत महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम अनुक्रमे १४० अ व १४० ब मन २०२५ – २०२६ या वर्षाकरीताही प्रचलित कार्यवाहीनुसार प्रस्तावित करण्यात आले आहे.

वीरगती प्राप्त झालेल्या सैनिकांचे पत्नीस / माता, तसेच पुणे शहरातील ज्यांना राष्ट्रपतीपदक मिळालेले तसेच बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक योजने अंतर्गत माजी सैनिक, सैनिक विधवा / पत्नी यांना त्यांच्या नावे असलेल्या एका मिळकतीस मालमत्ता करातून सूट दिली जाते. ती देखील तशीच ठेवण्यात आली आहे. तसेच घरमालक यांना निवासी मालमत्तेत ४०% सूट देखील तशीच ठेवण्यात आली आहे.  त्यानुसार प्रशासनाने हा प्रस्ताव मान्यतेसाठी स्थायी समिती च्या माध्यमातून मुख्य सभे समोर ठेवला आहे.

– विषय पत्रात तांत्रिक चुका

दरम्यान प्रशासनाने स्थायी समिती समोर जे विषयपत्र ठेवले आहे, त्यात बऱ्याच तांत्रिक चुका केलेल्या आढळून आल्या आहेत. सर्वसाधारण कराला सामान्य कर असे संबोधले गेले आहे.  तसेच विषय पत्रात म्हटले आहे कि, २०१६ पासून कुठलीही करवाढ केली नाही. प्रत्यक्षात करवाढ ही २०१८ पासून झाली आहे. वार्षिक करपात्र रकमेच्या १५% वजावट दिली जात होती. ती १०% केली. म्हणजे तेव्हापासून सरसकट ५% करवाढ लागू झाली. १ एप्रिल २०१८ पासून ९७ हजार प्रॉपर्टी ची ४०% सवलत काढून घेतली गेली.GIS मार्फत ज्या मिळकत दारांची ४०% सवलत काढण्यात आली, त्यांची    ही करवाढ जवळपास ४५% होत आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0