Pune Traffic Update | पुण्यात वाहतूक सुरळीत करण्यासाठी 500 AI कॅमेरे; ‘ITMS’ प्रकल्पाचा अहवाल सरकारकडे

HomeBreaking News

Pune Traffic Update | पुण्यात वाहतूक सुरळीत करण्यासाठी 500 AI कॅमेरे; ‘ITMS’ प्रकल्पाचा अहवाल सरकारकडे

Ganesh Kumar Mule Jun 06, 2026 8:02 PM

PMC Primary Education Department | पुणे मनपा शिक्षक बदल्यांचे धोरण जिल्हा परिषद शिक्षकांच्या धर्तीवर!
PMC Divyang Upchar Kendra | दिव्यांग बालकांसाठी वरदान ठरते आहे पुणे महापालिकेचे  दिव्यांग उपचार केंद्र!
UPSC Results | केंद्रीय लोकसेवा आयोगाचा (UPSC) निकाल जाहीर | महाराष्ट्रातील 60 हून अधिक उमेदवारांना घवघवीत यश

Pune Traffic Update | पुण्यात वाहतूक सुरळीत करण्यासाठी 500 AI कॅमेरे; ‘ITMS’ प्रकल्पाचा अहवाल सरकारकडे

| पुणे ट्रॅफिक परिषदेत अपर आयुक्त मनोज पाटील यांची माहिती

| नागरिकांच्या सहकार्याचे आवाहन

 

Pune Congress – (The Karbhri News Service) – पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलिस दल ‘तंत्रज्ञान, तज्ज्ञ सल्ला आणि नागरिकांचे सहकार्य’ या त्रिसूत्रीचा अवलंब करणार आहे. शहरात लवकरच 500 कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) कॅमेरे बसवले जाणार असून, मुंबईच्या धर्तीवर अत्याधुनिक वाहतूक नियंत्रण प्रणाली कार्यान्वित केली जाणार आहे, अशी माहिती अपर पोलीस आयुक्त (वाहतूक) मनोज पाटील यांनी दिली. (Pune News)

पुणे शहर जिल्हा काँग्रेसच्या पश्चिम विभागातर्फे शनिवारी पत्रकार संघात ‘पुणे ट्रॅफिक परिषद’ आयोजित करण्यात आली होती. या वेळी पाटील बोलत होते.

पाटील म्हणाले, वाहतूक कोंडीमुळे प्रत्येक पुणेकराच्या आयुष्यातील सरासरी दोन वर्षे रस्त्यावर वाया जात आहेत. नव्या AI कॅमेऱ्यांद्वारे नियमभंग करणाऱ्यांवर मानवी हस्तक्षेपाशिवाय स्वयंचलित दंडात्मक कारवाई होईल. ‘इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम’चा अहवाल मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठवला आहे. अरुंद रस्त्यांवर अल्पकालीन नियोजन करून JM रोड आणि FC रोडची क्षमता वाढवली असल्याचेही त्यांनी सांगितले.

शहरात 44 लाखांहून अधिक वाहने असून, 30 लाख दुचाकी आणि 9 लाख चारचाकी आहेत, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी दिली.

केवळ तंत्रज्ञानावर विसंबून न राहता नागरिकांनी नियम पाळावेत, तसेच कंपन्या आठवड्यातून एक दिवस ‘सार्वजनिक वाहतूक दिन’ पाळावा, अशी शिफारस पाटील यांनी केली.

परिषदेत कांग्रेस शहर अध्यक्ष दीप्ती चवधरी, संदीप भाजीभाकरे, एलिस पोरे, डॉ. राहुल सावंत, मंगेश कोळपकर यांच्यासह वाहतूक तज्ज्ञ आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. आगामी काळात 100 किमी मेट्रो जाळे आणि हायटेक यंत्रणा यामुळे वाहतूक समस्या सुटेल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: