Pune Propoerty Tax | सवलतीच्या कालावधीत पुणे मनपाचा मिळकत कर महसूल यंदा घटला |   2025-26 मध्ये 1246.90 कोटी, तर 2026-27 मध्ये 1230.27 कोटींची वसुली

Homeadministrative

Pune Propoerty Tax | सवलतीच्या कालावधीत पुणे मनपाचा मिळकत कर महसूल यंदा घटला |   2025-26 मध्ये 1246.90 कोटी, तर 2026-27 मध्ये 1230.27 कोटींची वसुली

Ganesh Kumar Mule Jun 05, 2026 7:54 PM

PMC NUHM Employees | राष्ट्रीय स्वास्थ अभियानाच्या कर्मचाऱ्यांसाठी पुणे मनपात एच.आर. पॉलिसीची अंमलबजावणी!
Dr Siddharth Dhende | अग्रसेन शाळा ते ई कोमरझोन रस्त्याच्या अंतिम टप्प्यातील कामाला गती – 60 लाख रुपयांच्या उर्वरीत रस्त्याच्या कामाची सुरूवात
PMC Assistant Commissioner | Why is the charge of Assistant Commissioner given to Deputy Engineer only?

Pune Propoerty Tax | सवलतीच्या कालावधीत पुणे मनपाचा मिळकत कर महसूल यंदा घटला |   2025-26 मध्ये 1246.90 कोटी, तर 2026-27 मध्ये 1230.2 7 कोटींची वसुली

| गेल्यावर्षी सवलत 7 जुलैपर्यंत वाढवली होती, यंदा होती 31 मे पर्यंत

 

BY Ganesh Mule. 

PMC Property tax Department – (The Karbhari News Service) –   पुणे महानगरपालिकेच्या मिळकत कर विभागाला सवलतीच्या कालावधीत मिळणाऱ्या महसुलात यंदा घट झाली आहे. 2026-27 आर्थिक वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यात मनपाला 1230.27 कोटी रुपये मिळाले आहेत.  मागील वर्षी PT ३ प्रक्रियेला विलंब झाल्याने बिले उशिरा देण्यात आली होती. त्यामुळे सवलतीचा कालावधी ७ जुलै पर्यंत वाढवण्यात आला होता.  या कालावधीत  1246.90 कोटी रुपये मिळकत कर विभागाला मिळाला होता. म्हणजे मागील वर्षीपेक्षा यंदा 17 कोटी कमी मिळाले आहेत. खरे पाहता दरवर्षी नवीन मिळकतींची आकारणी होती, त्यामुळे महसूल वाढणे अपेक्षित होते. मात्र तो कमी झाल्याचे पाहायला मिळाले आहे.  (Pune Municipal Corporation Property tax Department)

मागील वर्षी PT3 प्रोसेसिंगला विलंब झाल्याने 5-10% सवलतीचा कालावधी 31 मेवरून 7 जुलैपर्यंत वाढवण्यात आला होता. या प्रक्रियेला विलंब झाल्याने बिले देखील उशिरा देण्यात आली होती. बिले 1 एप्रिल पासून 30 एप्रिल पर्यंत वाटली गेली. त्यानंतर वसुली सुरु झाली.  म्हणजे एकूण ६७ दिवसात 1246.90 कोटी ची वसुली केली गेली. यंदा दरवर्षी प्रमाणे सवलत योजना 31 मे 2026 पर्यंत होती.

दोन वर्षांचा तुलनात्मक आढावा

2025-26 आर्थिक वर्ष:  निवासी मिळकतींना 40% सवलत आणि इतर मिळकतींना अधिनियमातील वजावटीच्या अंमलबजावणीत अडचण आल्याने देयके तयार करण्यास विलंब झाला होता. त्यामुळे 5-10% सवलतीचा कालावधी सुरुवातीला 31 मे पर्यंत होता. तो 30 जूनपर्यंत वाढवला होता, पुन्हा 7 दिवस वाढवून कालावधी 7 जुलै 2025 पर्यंत करण्यात आला.  या विस्तारित कालावधीत पुणे मनपाला 1246.90 कोटी रुपये मिळाले होते.

2026-27 आर्थिक वर्ष:  यंदा 1 एप्रिल ते 31 मे 2026 या 60 दिवसांत 5-10% सवलत योजना राबवण्यात आली. या काळात 6 लाख 58 हजार मिळकतधारकांनी 1230.27 कोटी रुपये भरले.  यातील  93.70% नागरिकांनी ऑनलाइन/डिजिटल प्रणालीद्वारे 800 कोटी रुपये भरले. उर्वरित लोकांनी रोख स्वरूपात  भरले.  एकूण 15.75 लाख मिळकतींपैकी 41% मिळकतधारकांनी सवलतीच्या कालावधीत कर भरला.

मागील वर्षी  PT3 प्रोसेसिंगला विलंब झाल्याने मनपाला सवलतीचा कालावधी वाढवावा लागला होता. त्यामुळे नागरिकांना कर भरण्यासाठी जवळपास जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत वेळ मिळाला. याउलट यंदा वेळेवर देयके तयार झाल्याने सवलत योजना 31 मे 2026 ला संपली.

1 ऑगस्ट 2026 पासून पहिल्या सहामाहीच्या करावर दरमहा 2% शास्ती आकारली जाणार असल्याने उर्वरित मिळकतधारकही लवकर कर भरतील, असा अंदाज आहे.
सध्या पुणे मनपाच्या हद्दीत 15.75 लाख मिळकती असून, सवलतीच्या कालावधीत भरलेला कर एकूण संभाव्य वसुलीच्या 40% पेक्षा अधिक आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: