Airport Facilities  | अवास्तव वाढलेले विमान भाडे, कॅन्टीनचे दर आणि विमान कंपन्यांच्या स्लॉट गैरवापरावर तपासणी करून भाड्यांवर नियंत्रण आणावे – युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रथमेश आबनावे यांची केंद्रीय राज्यमंत्री यांच्याकडे मागणी 

HomeBreaking News

Ganesh Kumar Mule Jan 29, 2025 7:47 PM

Transfer | PMC | आणखी 646 सेवकांच्या होणार बदल्या! | प्रशासन अधिकारी, उप अधिक्षक, लिपिकांचा समावेश
Pune Book Festival News| ‘ज्ञान सरिता ग्रंथ दिंडी’तून ‘पुणे पुस्तक महोत्सवा’चा जागर | न्यू इंग्लिश स्कूल ते फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानापर्यंत काढलेल्या ग्रंथदिंडीत पाच हजाराहून अधिक मुलांचा सहभाग
MP Suspension | Pune Congress | १४२ खासदारांचे निलंबन हे देश अराजकतेकडे नेण्याचे लक्षण | अरविंद शिंदे

Airport Facilities  | अवास्तव वाढलेले विमान भाडे, कॅन्टीनचे दर आणि विमान कंपन्यांच्या स्लॉट गैरवापरावर तपासणी करून भाड्यांवर नियंत्रण आणावे – युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रथमेश आबनावे यांची केंद्रीय राज्यमंत्री यांच्याकडे मागणी

Maharashtra News – (The Karbhari News Service) महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रथमेश आबनावे (Prathmesh Abnave) यांनी केंद्रीय सहकार आणि नागरिक उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांना पत्र लिहून हवाई भाड्यातील वाढ, विमानतळावरील महागडे अन्नपदार्थ आणि खाजगी विमान कंपन्यांच्या विमानतळ स्लॉटच्या गैरवापरावर सखोल तपासणी करून त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे. (Airport Facilities)

या केल्या आहेत मागण्या

१. वाढलेल्या विमान भाड्यांवर नियंत्रण आणावे:

सण, उत्सव आणि उन्हाळी सुटीच्या काळात हवाई प्रवासाचे तिकीट २ ते ४ पट वाढते, यामुळे सामान्य आणि मध्यमवर्गीय प्रवाशांना मोठा आर्थिक फटका बसतो. ही दरवाढ नियंत्रित करण्यासाठी सरकारने तपासणी करून हवाई भाड्यांवर मर्यादा घालावी आणि मनमानी दरवाढ थांबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

२. वाढलेल्या कॅन्टीन दरांची तपासणी करून स्वस्त दर लागू करावेत:

विमानतळावर चहा-कॉफी यांसारख्या मूलभूत गोष्टींसाठी प्रवाशांना ₹२०० पेक्षा जास्त किंमत मोजावी लागते, जी सामान्य नागरिकांसाठी अयोग्य आहे. या अवास्तव दरांची सखोल चौकशी करून, विमानतळांवर परवडणारी कॅन्टीन सेवा सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

३. विमान कंपन्यांच्या स्लॉट गैरवापरावर तपासणी करून कारवाई करावी:

अनेक विमान कंपन्या महत्वाचे विमानतळ स्लॉट बुक करून ते योग्यप्रकारे वापरत नाहीत, परिणामी बळजबरीने सीट कमी दाखवून भाडे वाढवले जाते. यासाठी सरकारने तपासणी करून, स्लॉट गैरवापर करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करावी, असे आबनावे  यांनी सांगितले.

आबनावे य यांनी सरकारला वाढत्या हवाई भाड्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, विमानतळांवरील महागाई रोखण्यासाठी आणि स्लॉट गैरवापरास आळा घालण्यासाठी तातडीने कठोर उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे. योग्य पावले उचलल्यास सामान्य प्रवाशांचा आर्थिक बोजा कमी होईल आणि हवाई प्रवास अधिक न्याय्य व परवडणारा होईल. महाराष्ट्र युवक काँग्रेस नागरिकांच्या हक्कांसाठी लढत राहणार असून, हवाई वाहतूक क्षेत्रात पारदर्शक व न्याय्य धोरणांसाठी संघर्ष सुरू ठेवेल. असेही आबनावे यांनी म्हटले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0