PMC Property Tax Department | वसुलीसाठी प्रॉपर्टी टैक्स विभागाकडे अतिरिक्त ५५ कर्मचारी!
| दोन महिन्यांसाठी असणार नियुक्ती
Pune Properyt Tax – (The Karbhari News Service) – महापालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागाने (Pune Municipal Corporation property tax De) मिळकत कराच्या (Pune Property Tax) वसुलीवर जोर दिला आहे. कारण वसुलीसाठी दोनच महिने शिल्लक आहेत. वसुलीसाठी विभागाला अतिरिक्त ५५ कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी (Prithviraj B P IAS) यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. (Pune Municipal Corporation – PMC)
पुणे महापालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्स विभागाने (Pune Municipal Corporation Property Tax Department) आता टॅक्स वसुलीवर जोर दिला आहे. विभागाने आतापर्यंत २ हजार कोटी हून अधिक महसूल वसूल केला आहे. वसुलीसाठी कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या होत्या एम. समाविष्ट २३ गावातील ८७ कर्मचाऱ्यांच्या नुकत्याच बदल्या करण्यात आल्या होत्या.
त्यानंतर आता विभागाच्या मागणी नुसार अतिरिक्त ५५ कर्मचारी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विविध विभागातील हे कर्मचारी आहेत. ही नियुक्ती ३१ मार्च पर्यंत असणार आहे.
COMMENTS