PMC Property Tax Department | उद्यापासून पुणेकरांचे नळ कनेक्शन तोडण्याची होणार कारवाई | जाणून घ्या महापालिका का उचलणार हे पाऊल?
Pune Property Tax – (The Karbhari Mews Service) – शहरातील नागरीकांचा तसेच व्यावसायिकांचा मिळकतकर भरण्याकडे कल दिसून येत नाही. त्यामुळे महापालिका मिळकतकर विभागाने निर्णय घेतला आहे की, उद्यापासून म्हणजे १ जानेवारी पासून ज्या नागरिकांकडे मिळकत कराची थकबाकी आहे, त्यांचे नळ कनेक्शनच (PMC Water Connection) तोडले जाणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी थकबाकी भरावी. असे आवाहन विभाग प्रमुख तथा उपायुक्त माधव जगताप (Madhav Jagtap PMC) यांनी केले आहे. (Pune Municipal Corporation – PMC)
मिळकत कर हा महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा महत्वाचा स्त्रोत असून, त्यातूनच शहरातील विकास कामे होत असतात. कर आकारणी व कर संकलन खात्यास सन २०२४- २५ मध्ये दिलेले मिळकत कर जमा करण्याचे उद्दीष्ट पुर्ततेसाठी थकवाकी वसूलीवर मोठ्या प्रमाणात लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने २ डिसेंबर पासून मिळकत कर वसुलीसाठी ५ पथके तयार करण्यात आली. त्यांचे मार्फत दररोज निवामी, बिगर निवासी थकबाकीदार मिळकतीना भेटी देऊन मिळकतकर वसूलीची कारवाईकरण्यात येत आहे. (Pune PMC News)
त्यानुषंगाने मिळकत कर वसुलीसाठी ५ पथके तयार करण्यात आली असून त्यांचे मार्फत दररोज निवासी, बिगर निवासी थकबाकीदार मिळकतीना भेटी देऊन मिळकत कर वसुलीची कारवाई करण्यात येत आहे. आज मितीस ७१ कोटी ४१ लाख ,८५ हजार ३९३ /- एवढी मिळकतकराची थकबाकी या पथकाद्वारे वसूल करण्यात आली आहे.
परंतू अद्यापही नागरीकांचा/व्यावसायिकांचा मिळकतकर भरण्याकडे कल दिसून येत नाही. त्या अनुषंगाने उद्या दि १/१/२०२५ रोजी पासून मध्यवर्ती वसूली पथकांसोबत १ प्लंबर, ३ बिगारी सेवक व त्या-त्या विभागातील विभागीय निरीक्षक व पेठ निरीक्षक तमेच प्रत्येक झोन निहाय एकूण ५ पथके यांचे मार्फत थकबाकीदार मिळकतीचे नळजोड तोडण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. मिळकत कराच्या थकबाकीची रक्कम पूर्णपणे भरल्या नंतरच सदरचे नळजोड पूर्ववत करण्यात येणार आहेत.
तरी सर्व निवासी / बिगर निवासी मिळकतधारकांस याद्वारे आवाहन करण्यात येत आहे की, त्यांनी मिळकतकराची थकवाची त्वरीत भरून नळजोड तोडण्याची कारवाई टाळावी व प्रशासनास मिळकत कराचे उदिष्ट साध्य करणेसाठी सहकार्य करावे. असे जगताप यांनी सांगितले.
COMMENTS