Pune PMC News | TAX INVOICE नाही तर बिल नाही | ठेकेदारांना आता INVOICE देणे बंधनकारक
PMC Pune – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या विविध विभागांकडून विविध प्रकारची कामे कंत्राटी पद्धतीने करून घेण्यात येतात. त्यांची बिले ठेकेदारांना अदा केली जातात. मात्र केंद्र सरकारने नुकतेच GST कायद्यात बदल केले आहेत. त्यानुसार आता ठेकेदारांना बिल हवे असेल तर TAX INVOICE देणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबत लेखा विभागाकडून आदेश जारी करण्यात आले आहेत. (Dr Kunal Mandwale PMC)
महापालिकेची विविध कामे करून घेताना पुरवठादार / निविदाधारक यांना कार्यादेश देऊन त्यांनी केलेल्या कामाचे / पुरवठा केलेल्या साहित्याचे देयक प्रचलित पद्धतीने आदा करण्यात येते. दरम्यान वस्तू व सेवा कर नेटवर्क (GSTN ) यांनी कर कपाती संदर्भात (TDS) बदल केले आहेत. फॉर्म GSTR-7 मध्ये सुधारणा करून ज्या पुरवठ्यांवर TDS वजा करण्यात आला त्याचे देयकनिहाय तपशील नोंदविण्याची सुविधा जोडण्यात आली आहे. याबाबत पुणे महानगरपालिकेने नियुक्त केलेले कर सल्लागार मे. ए. एन. गावडे आणि कं. यांनी सूचित केले आहे.
त्यानुसार लेखा विभागाने सर्व विभागांना सूचित केले आहे की, पुरवठादार / निविदाधारक यांनी केलेल्या कामाचे / पुरवठा केलेल्या साहित्याचे देयक TAX INVOICE त्यांचेकडून घेणे बंधनकारक करण्यात आलेआहे. TAX INVOICE निविदाधारकाने खात्यामध्ये सादर केल्याशिवाय खात्याने मुख्य लेखा व वित्त विभागाकडे बिल सादर करू नये याची सर्व खात्यांनी दक्षता घ्यावी. पुरवठादार / निविदाधारक यांनी TAX INVOICE सादर करताना त्यावर निविदाधारक यांचा GST क्रमांक, कामाचे नाव, खात्याचे नाव, एकूण देयक मूल्य, ज्या रक्कमेवर GST, TDS वजावट करावयाची आहे ती रक्कम, CGST, SGST, IGST, TDS रक्कम नमूद असणे आवश्यक आहे.
या प्रमाणे कार्यवाही करून सर्व विभागांनी मुख्य लेखा व वित्त विभागाकडे देयक (बिल) सादर करण्याची कार्यवाही करावी. असे आदेश प मुख्यलेखा व वित्त अधिकारी तथा मुख्य अनुपालन अधिकारी डॉ. कुणाल मांडवाले यांनी जारी केले आहेत.

COMMENTS