PMC Encroachment Action | विविध क्षेत्रीय कार्यालयांच्या वतीने संयुक्त अतिक्रमण कारवाई | ३१७०० चौरस फुट अनधिकृत बांधकाम हटवले
Pune PMC News – (The Karbhari News Service) – महापालिका आयुक्त यांचे आदेशानुसार सयुंक्त कारवाईचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार पुणे महानगरपालिकेच्या ढोले पाटील, कोथरूड- बावधन, वारजे कर्वेनगर, कोंढवा-येवलेवाडी व बिबवेवाडी क्षेत्रिय कार्यालय हद्दीमधील सार्वजनिक रस्ते पदपथावरील अनधिकृत अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली. अशी माहिती अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मुलन विभागाच्या वतीने देण्यात आली. (PMC Encroachment/Illegal Construction Removal Department)
संदीप खलाटे, (उप आयुक्त, अतिक्रमण/अनाधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग) यांचे नियंत्रणाखाली तसेच संबंधित क्षेत्रिय कार्यालयांकडील महापालिका सहाय्यक आयुक्त, बांधकाम विकास विभागाकडील कार्यकारी अभियंता, उप अभियंता व कनिष्ठ अभियंता तसेच विभागीय अतिक्रमण अधिकारी, क्षेत्रिय अतिक्रमण निरीक्षक, अतिक्रमण निरिक्षक, सहाय्यक अतिक्रमण निरिक्षक, तसेच बिगारी सेवक, पोलीस कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे कर्मचारी यांचे उपस्थितीत उप आयुक्त, परिमंडळ कार्यालय क्र. १ ते ५ अंतर्गत पुणे शहराच्या विविध भागांमध्ये रस्तारुंदीत येणारी फ्रंट मार्जिन / साईट मार्जिन मधील अतिक्रमणे तसेच रस्ता / पदपथांवर अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या पथारी व्यावसायीकांवर तसेच पुणे महानगरपालिकेने अतिक्रमण विभागामार्फत दिलेले परवाने व फेरीवाला प्रमाणपत्रामधील अटी / शर्तीचा भंग करणारे व्यावसायिक यामध्ये स्वतः व्यवसाय न करणे, पोटभाडेकरू ठेवणे, मान्य जागेवर व्यवसाय न करणे, मान्य व्यवसाय न करणे, सिलेंडरचा वापर करणे इत्यादी प्रकारे अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली.
या कारवाईत ३१७०० चौरस फुट अनधिकृत बांधकाम हटवण्यात आले. तर १३ हातगाडी, ४१ पथारी, १० सिलेंडर, ८८ झोपड्या, इतर ८३ यावर कारवाई करण्यात आली.

COMMENTS