Annasaheb Waghire College | अभिजात मराठी भाषेला गौरवशाली परंपरा: प्रा. डॉ. वसंत गावडे
Pune News – (The Karbhari News Service) – पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे, अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय, ओतूर, ता-जुन्नर,पुणे येथे मराठी व ग्रंथालय विभागाच्या वतीने अभिजात मराठी भाषा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेंद्र अवघडे व मराठी विभाग प्रमुख डॉ.वसंत गावडे यांनी दिली. (Dr Vasant Gavade)
३ ते ९ ऑक्टोबर दरम्यान विविध उपक्रम आयोजित केले होते. ३ ऑक्टोबर २०२४ या दिवशी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. म्हणून ३ऑक्टोबर हा दिवस अभिजात मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्याचे शासनाने ठरविले. या दिवशी सदर दिन साजरा करून सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले.
उद्घाटनपर भाषणात डॉ.वसंत गावडे म्हणाले, *” मराठी भाषा काल ही अभिजात होती. आज ही आहे. उद्या ही अभिजात राहणार आहे. मराठी संस्कृतीतील विविध पैलूंवर यावेळी प्रकाश टाकण्यात आला.अभिजात भाषेचा दर्जा देताना मराठी भाषेची सुमारे २५०० वर्षाची परंपरा गृहीत धरण्यात आली आहे. प्राचीन ग्रंथांची विविध लिपीतील भाषा,व्यवहारातील व विविध कलाप्रकारातील भाषेच्या उपयोगाची गौरवशाली परंपरा विविध घटकांसमोर , मराठी भाषेचे वैभव जपण्यासाठी मराठी भाषेचे संवर्धन व्हावे, जनमाणसा मध्ये मराठी भाषेच्या अभिजाततेची ओळख व्हावी. मराठी मातीच्या गंधात मराठी लोकपरंपरा रुजलेली आहे. मराठी भाषेच्या संदर्भात संशोधन व जनजागृती जास्तीत जास्त व्हावी. म्हणून हा दिवस आपण साजरा करत आहोत. नाणेघाट शिलालेखातील “महारठ्ठी” उल्लेख हा मराठी भाषेच्या प्राचीनत्वाचा आणि अभिजाततेचा महत्त्वाचा पुरावा मानला जातो, ज्याने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली आहे. मराठीला लोकसाहित्याची गौरवशाली परंपरा आहे.
४. ऑक्टोंबर पासून मराठी भाषेचा अभिमान व गौरव व्यक्त करणाऱ्या अनुक्रमे काव्यवाचन व काव्य लेखन, ऑनलाइन प्रश्नमंजुषा, निबंध, घोषवाक्य इ.स्पर्धा तसेच विशेष व्याख्यान,ग्रंथदिंडी व समारोप समारंभ यांचे आयोजन करण्यात आले होते.
प्राचार्य डॉ. महेंद्र अवघडे व डॉ. निलेश हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम संपन्न झाला.डॉ. उमेशराज पनेरू, डॉ. राजेंद्र आंबवणे,डॉ. आशुतोष ठाकरे, उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी उपप्राचार्य डॉ. के.डी. सोनावणे व डॉ. रमेश शिरसाट यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.छाया तांबे व सूत्रसंचालन डॉ. रोहिणी मदने यांनी केले.

COMMENTS