PMC Holiday | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना भाऊबीज ची सुट्टी जाहीर!
Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महापालिका कर्मचारी आणि अधिकारी यांना २३ ऑक्टोबर अर्थात भाऊबीज ची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्त एम जे प्रदीप चंद्रन यांनी हे आदेश जारी केले आहेत. (Pune Municipal Corporation – PMC)
राज्य शासनाच्या वतीने पुणे जिल्ह्यातील सरकारी कार्यालयांना १ अतिरिक्त सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यात दिवाळी सणाच्या भाऊबीज निमित्त देण्यात येणाऱ्या सुट्टीचा समावेश आहे. दरम्यान या आधी नरक चतुर्दशी अर्थात सोमवार ची अतिरिक्त सुट्टी जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार आता दिवाळीच्या सुट्ट्या जवळपास आठवडाभर असणार आहेत. कारण आता सोमवार ते गुरुवार सुट्टी असणार आहे. त्या आधी शनिवार आणि रविवार ची साप्ताहिक सुट्ट्या जोडून आल्या आहेत. त्यामुळे कर्मचारी हर्षोल्लास ने दिवाळी साजरी करणार आहेत.
दरम्यान महापालिका कर्मचाऱ्यांना नुकताच दिवाळी उचल (Advance) देण्यात आली आहे. तसेच सानुग्रह अनुदान आणि बोनस देखील लवकरच खात्यात जमा होईल. तर कंत्राटी कर्मचाऱ्यांना देखील मुख्य सभेची मंजुरी मिळाल्या नंतर वेतनात बोनस अदा केला जाणार आहे.


COMMENTS