PMC Sport Competition | कामगार कल्याण निधी आयोजित क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन प्रभारी अतिरिक्त आयुक्त महेश पाटील यांच्या हस्ते 

Homeadministrative

PMC Sport Competition | कामगार कल्याण निधी आयोजित क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन प्रभारी अतिरिक्त आयुक्त महेश पाटील यांच्या हस्ते 

Ganesh Kumar Mule Jan 30, 2025 8:04 PM

Mahesh Patil PMC | उपायुक्त महेश पाटील यांना पुणे महापालिकेत पदोन्नती! | पदस्थापने वरून मात्र संभ्रम 
Maratha Reservation Survey | PMC Officers and Enumerators Payment | मराठा आरक्षण सर्वेक्षणाचे काम केलेल्या मनपा कर्मचाऱ्यांचे मानधन तिजोरीत तसेच पडून!   | मानधन वितरण बाबत निवडणूक विभागाची उदासीनता 
PMC General Administration Department | सामान्य प्रशासन विभागाचा अतिरिक्त पदभार उपायुक्त्त प्रतिभा पाटील यांच्याकडे!

PMC Sport Competition | कामगार कल्याण निधी आयोजित क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन प्रभारी अतिरिक्त आयुक्त महेश पाटील यांच्या हस्ते

 

PMC Kamgar Kalyan Nidhi – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका कामगार कल्याण निधी आयोजित क्रीडा स्पर्धांचा उद्घाटन समारंभ  29 जानेवारी  रोजी सकाळी 9.30 वाजता पंडित नेहरू स्टेडियम येथे प्रभारी अतिरिक्त महापालिका आयुक्त महेश पाटील यांचे उपस्थितीत व प्रमुख पाहुणे निकीत धुमाळ, महाराष्ट्र रणजी खेळाडू यांचे शुभहस्ते पार पडला. (Pune PMC News)

महेश पाटील यांनी सर्व कर्मचाऱ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा देताना सर्व कर्मचारी यांनी खेळीमेळीच्या वातावरणात स्पर्धा पार पाडावी, आपण नेहमी ताणतणावात काम करतो त्यामुळे स्पर्धा आपला तणाव कमी करण्यासाठी मदत करतात असे नमूद केले.

तदनंतर निकीत धुमाळ यांचे हस्ते क्रीडा स्पर्धाचे उदघाटन करण्यात आले. महेश पाटील यांनी टॉस उडवून सामना सुरू केला.

सदर कार्यक्रमास नितीन केंजळे, मुख्य कामगार अधिकारी, संदीप खलाटे, उप आयुक्त, कुणाल मंडवाले, उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी, राजेश कदबाने, महापालिका सहाय्यक आयुक्त तसेच कामगार कल्याण निधी सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती मनीषा कायटे यांनी केले व कार्यक्रमाचे नियोजन प्रशांत चव्हाण, सुहास शेवते, देवदत्त देवकर व सर्व समन्वयक यांनी केले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0