PMC Standing Committee | स्थायी समितीची बैठक; पाणीटंचाई व दूषित पाणी पुरवठ्यावरून सदस्य आक्रमक

Homeadministrative

PMC Standing Committee | स्थायी समितीची बैठक; पाणीटंचाई व दूषित पाणी पुरवठ्यावरून सदस्य आक्रमक

Ganesh Kumar Mule May 27, 2026 8:29 PM

Viksit Bharat Sankap Yatra | विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून महानगरपालिकेद्वारे विविध योजनांचा लाभ
G 20 Summit Pune | पुणेकर नागरिकांच्या सहकार्याने जी-२० बैठक यशस्वी करू | पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची ग्वाही
40% Tax Exemption | ४०% करसवलत | राज्य सरकार घालणार लक्ष | मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

PMC Standing Committee | स्थायी समितीची बैठक; पाणीटंचाई व दूषित पाणी पुरवठ्यावरून सदस्य आक्रमक

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – आचारसंहिता लागू असतानाही निवडणूक विभागाने परवानगी दिल्याने पुणे महापालिकेची स्थायी समिती बैठक बुधवारी पार पडली. स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत शहरातील पाणीटंचाई व दूषित पाणीपुरवठ्याचा मुद्दा ऐरणीवर आला. (Pune Municipal Corporation – PMC)

आचारसंहिता काळात कोणत्याही नवीन प्रस्तावांना मंजुरी देण्यास मनाई आहे. मात्र धोरणात्मक बाबी व नागरिकांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी बैठक घेण्यास निवडणूक विभागाने हिरवा कंदील दिला. त्यानुसार ही बैठक घेण्यात आली. बैठकीत कोणताही नवीन प्रस्ताव मंजूर करण्यात आला नाही.

दूषित पाण्यावरून सदस्यांचा संताप
शहरातील काही भागात नागरिकांना पिण्याचे दूषित पाणी मिळत असल्याची गंभीर तक्रार सदस्यांनी बैठकीत मांडली. विशेषतः उपनगरांमधील सोसायट्यांमध्ये गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याकडे सदस्यांनी लक्ष वेधले. पावसाळ्यापूर्वी जलवाहिन्यांची तपासणी व दुरुस्ती करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

पाणीटंचाईचीही ओरड
यासोबतच शहरातील अनेक भागात पाणीटंचाई असल्याची तक्रार सदस्यांनी केली.  पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. काही भागात टँकरने पाणीपुरवठा करावा लागत असल्याचे सदस्यांनी सांगितले. उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात पाण्याची मागणी वाढल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे.

अधिकाऱ्यांचे आश्वासन
सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. दूषित पाण्याच्या तक्रारी असलेल्या भागातील जलवाहिन्यांची तपासणी करून गळती काढण्यात येईल. तसेच टंचाईग्रस्त भागात पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले जाईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

ड्रेनेज लाईनच्या कामावरही चर्चा
पाणी प्रश्नाबरोबरच बैठकीत शहरातील ड्रेनेज लाईनच्या कामांचाही आढावा घेण्यात आला. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई व ड्रेनेज लाईनची दुरुस्ती पूर्ण करण्याच्या सूचना अध्यक्ष भिमाले यांनी प्रशासनाला दिल्या. पावसाळ्यात सखल भागात पाणी साचू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला.

दरम्यान, आचारसंहितेमुळे विकासकामांचे प्रस्ताव रखडले असले तरी नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी स्थायी समितीची बैठक महत्त्वाची ठरली.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: