PMC Solid Waste Management | महापालिका घनकचरा विभागाच्या  निरुपयोगी वस्तू संकलनाच्या महाअभियानाला नागरिकांचा  उस्फुर्त प्रतिसाद  | जमा झालेल्या कचऱ्यावर शास्त्रीय पद्धतीने केली जाणार प्रक्रिया!

Homeadministrative

PMC Solid Waste Management | महापालिका घनकचरा विभागाच्या  निरुपयोगी वस्तू संकलनाच्या महाअभियानाला नागरिकांचा  उस्फुर्त प्रतिसाद  | जमा झालेल्या कचऱ्यावर शास्त्रीय पद्धतीने केली जाणार प्रक्रिया!

Ganesh Kumar Mule Oct 13, 2025 8:38 AM

Dr Siddharth Dhende | प्रभाग दोन मध्ये फराळ वाटपातून सर्वसामान्यांची दिवाळी गोड – माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचा 20 वर्षे उपक्रम
Dr Siddharth Dhende | सामाजिक बांधिलकीतून उजळली दिवाळी – सावली संस्थेतर्फे डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या हस्ते 250 बेघर आणि गरजूंना साड्या व फराळ वाटप
PMC Holiday | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना भाऊबीज ची सुट्टी जाहीर!

PMC Solid Waste Management | महापालिका घनकचरा विभागाच्या  निरुपयोगी वस्तू संकलनाच्या महाअभियानाला नागरिकांचा  उस्फुर्त प्रतिसाद  | जमा झालेल्या कचऱ्यावर शास्त्रीय पद्धतीने केली जाणार प्रक्रिया!

 

 

Sandip Kadam PMC – (The Karbhari News Servicee) – पुणे महानगरपालिका, घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत सणसमारंभाच्या अनुषंगाने विविध प्रकारच्या निरुपयोगी वस्तूंच्या संकलनाचे महा अभियान राबविण्यात आले आहे. या अभियानाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद  मिळत आहे. १५ क्षेत्रीय कार्यालया मार्फत जमा केलेल्या कचऱ्यावर शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया केली जाणर आहे. अशी माहिती उपायुक्त संदीप कदम यांनी दिली. (Pune Municipal Corporation – PMC)

दसरा, दिवाळी व विविध सण समारंभाच्या पार्श्वभूमीवर घरातील जुन्या वस्तू, फर्निचर बदलले जातात. त्याचप्रमाणे गाद्या, उश्या यांचा कचरासुद्धा मोठ्या प्रमाणावर साठून राहतो. अशा प्रकारचा कचरा इतः स्ततः पडू नये याकरिता हा कचरा गोळा करून पुणे महानगरपालिकेच्या सिस्टीममध्ये आणणे व त्यावर RRR (Reduce, Reuse, and Recycle) संकल्पना राबविणे आवश्क आहे. त्या अनुषंगाने दिनांक १०,११,१२ ऑक्टोबर  रोजी सकाळी ०९.०० ते सायंकाळी ०५.०० या कालावधीत सर्व क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत प्रत्येक प्रभागात चिंध्या, उश्या, गाद्या, फर्निचर, समारंभाच्या अनुषंगाने घराघरातून निघणारे साहित्य जसे कि, देवी-देवतांचे फोटो व इतर साहित्य, ई-कचरा व प्लास्टिक कचरा संकलन मोहीमीचे आयोजन करण्यात आले होते.

या अभियानामध्ये पुणे महानगरपालिके समवेत, जनवाणी, कमिन्स इंडिया फाउंडेशन, के.पी.आय.टी. टेक्नॉलॉजी, आदर पूनावाला क्लीन सिटी इनिशिएटीव्ह तसेच श्रीमती श्यामला देसाई यांनी सहभाग घेतला.

महाअभियानाच्या कालावधीमध्ये १५ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत  १० रोजी ऑक्टोबर ला  चिंध्या 702 किलो, उश्या 366 किलो, गाद्या 4071 किलो, जुने फर्निचर 1004 संख्य, देवी-देवताचे फोटो 73 संख्या, ई-कचरा 563.5 किलो, प्लास्टिक कचरा 505 किलो, इतर 256  तर  ११ ऑक्टोबर  रोजी चिंध्या 1261 किलो, उश्या 360.5 किलो, गाद्या 3138 किलो, जुने फर्निचर 1520 संख्य, देवी-देवताचे फोटो 135 संख्या, ई-कचरा 394.5 किलो, प्लास्टिक कचरा 230 किलो, इतर 1653 किलो तसेच  १२ ऑक्टोबर  रोजी चिंध्या 2955.3 किलो, उश्या 821.05 किलो, गाद्या 3427 किलो, जुने फर्निचर 2269 संख्य, देवी-देवताचे फोटो 384 संख्या, ई-कचरा 3389.5 किलो, प्लास्टिक कचरा 448.43 किलो, इतर 1260 किलो याप्रमाणे एकूण चिंध्या 4918.3 किलो, उश्या 1547.55 किलो, गाद्या 10636 किलो, जुने फर्निचर 4793 संख्य, देवी-देवताचे फोटो 592 संख्या, ई-कचरा 4347.5 किलो, प्लास्टिक कचरा 1183.43 किलो, इतर 3169 किलो इतके संकलन करण्यात आले. संकलित केलेला सर्व प्रकारचा कचरा पुणे महानगरपालिकेमार्फत ऑथराईज्ड रीसायक्लर्सकडे सुपूर्त करून त्याचे शात्रोक्त पद्धतीने पुढील नियोजन करण्यात येणार आहे. असे उपायुक्त कदम यांनी सांगितले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0