PMC Social Devlopment Department | पुणे महानगरपालिका दिवाळी बचत बाजार प्रदर्शन व विक्री उपक्रम आज पासून सुरु | १५ ऑक्टोबर पर्यंत नागरिकांना ५ ठिकाणी खरेदी करता येणार
PMC Social Devlopment Department – (The Karbhari News Service) – पुणे महापालिका समाज विकास विभाग पुरस्कृत शेजार समूह गट व बचत गटांतील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तुंचे ‘दिवाळी बचत बाजार प्रदर्शन व विक्री उपक्रम’ आज पासून (११ ऑक्टोबर) सुरु झाले आहे. हे प्रदर्शन १५ ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे. शहरातील ५ ठिकाणी हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. अशी माहिती समाज विकास विभागाच्या वतीने देण्यात आली. तसेच या प्रदर्शनास भेट देण्याचे आवाहन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. (Pune Municipal Corporation -PMC)
प्रदर्शनात कशाची खरेदी कराल?
दिवाळी फराळ व साहित्य : चकली, लाडू, करंजी, शंकरपाळी, अनारसे, शेव, चिवडा, पणत्या, रांगोळी, दीपमाळा, आकाशकंदिल
इतर खाद्यपदार्थ : वांग्याचे भरीत, पिठलं-भाकरी, मांडे, सॉस, शीतपेये, सोलकढी, लोणची, पापड, विविध मसाले, तयार पिठे, शेवया, कुराड्या, या व्यतिरिक्त बिर्याणी व इतर शाकाहारी व मांसाहारी खाद्य पदार्थांचे विविध प्रकार, तसेच घरगुती वापरातील विविध वस्तू-लाकडी खेळणी, स्वेटर्स, तयार कपडे, फिनाईल, तोरण, लोखंडी तवे, आयुर्वेदिक उत्पादने, लेदर-कापडी पिशव्या, कापडी फाईल, फोल्डर, पेपर प्रॉडक्टस्, ज्वेलरी व सौंदर्य प्रसाधने, अगरबत्ती इ. विविध प्रकारचे स्टॉल्स्,

प्रदर्शन दिनांक, स्थळ व वेळ ::::
११ ते १५ ऑक्टोबर
वेळ सकाळी ११-०० ते रात्री ९-००
– कुठे असणार प्रदर्शन?
१ . पु.ल. देशपांडे उद्यान, सिंहगड रोड
२ . नविन भाजी मंडई, पुण्यनगरी शेजारी, स्टेलामेरी शाळेसमोर, वडगांवशेरी
३ . कै. नथुजी मेंगडे जलतरण तलाव, कमिन्स कॉलेजजवळ, गल्ली क्र. १, शाहु कॉलनी कर्वेनगर
४ कात्रज दुध डेअरी, एक्स्पो मैदान, कात्रज
५ जीत मैदान, वनाज मेट्रो स्टेशन जवळ, वनाज

COMMENTS