PMC Fog Canon Machine | दिवाळीच्या फटाक्या मुळे वाढलेले हवा प्रदूषण पाहता महापालिका गुरुवार पासून करणार फॉग कॅनॉन मशीनचा वापर | गेल्या काही महिन्यापासून मशीन होत्या बंद
| उपायुक्त रवी पवार यांची माहिती
PMC Environment Department – (The Karbhari News Service) – पुणे शहरात हवेची गुणवत्ता अधिक बिघडली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात दिवाळीमुळे वायुप्रदूषणात वाढ झाली असून, हवेची गुणवत्ता अतिशय खराब नोंदविण्यात आली आहे. दरम्यान महापालिका प्रशासनाने हवा प्रदूषण (Pune Air Pollution) कमी करण्यासाठी काही महिन्यापूर्वी ५ फॉग कॅनन मशीन खरेदी केल्या होत्या. मात्र काही महिन्यापासून या मशीन बंदच होत्या. मात्र आता हवा प्रदूषण कमी करण्यासाठी महापालिका या मशीनचा वापर सुरु करणार आहे. येत्या गुरुवार पासून या मशीन सुरु केल्या जाणार आहेत. अशी माहिती महापालिका पर्यावरण विभागाचे उपायुक्त उपायुक्त रवी पवार (Deputy Commissioner Ravi Pawar) यांनी दिली. (Pune Municipal Corporation – PMC)
केंद्र सरकारच्या नॅशनल क्लीन एअर प्रोगाम (NCAP) मधील 15 व्या वित्तीय आयोग अंतर्गत भारतातील १३० शहरातील हवा प्रदूषण कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. हवा प्रदूषणामध्ये PM 10 (१० मायक्रॉन पेक्षा कमी आकार असलेले धुलीकण) व PM 2.5 (२.५ मायक्रॉन पेक्षा कमी आकार असलेले धुलीकण ) अशा धुलीकणांचे प्रमाण कमी करण्यासाठी उपाययोजना म्हणून NCAP मध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणेसाठी पुणे महानारपालिकेमार्फत (Pune Municipal Corporation – PMC) ५ परिमंडळसाठी प्रत्येकी १ असे एकूण ५ फॉग कॅनन मशीन (Fog Cannon Machine) खरेदी करण्यात आले आहेत. (Pune PMC News)
फॉग कॅनॉन मशीनसाठी एका CNG इंधन वापरणाऱ्या ट्रकच्या चासीवर ६००० लिटरची स्टीलची टाकी बसविण्यात आली आहे. ट्रकच्या मागील बाजूस २२ नोझल असलेले ३ KW चा high pressure pump पॉवर असलेले फॉग कॅनॉन मशीन बसविण्यात आले आहे. या मशीनमध्ये २२ पाण्याचे नोझल बसविणात आले असून त्यामधून १० kg /sq cm एवढ्या प्रेशरने ५० मायक्रॉन पर्यंतचे पाण्याचे अतिसूक्ष्म कण बाहेर फेकले जातात. यामुळे हवेतील धुलीकणांचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. अशा प्रकारच्या मशीन्स दिल्ली, चंडीगड, मीराभायंदर, पिंपरी-चिंचवड व इतर शहरांमध्ये वापरण्यात येत आहे. रस्त्यांवरील धुळीचे प्रमाण कमी करणेच्या दृष्टीने Fog Cannon मशीनचा वापर करण्यात येणार आहे.
मशीन घेतल्या असल्या तरी या मशीन फक्त सुरुवातीचा महिनाभर वापरण्यात आल्या. म्हणजे फक्त एप्रिल महिन्यातच या मशीन वापरण्यात आल्या. मे महिन्यापासून पाउस सुरु झाला. तेव्हापासून ते आज पर्यंत या मशीन बंद अवस्थेत होत्या. मात्र शहरात हवेची बिघडलेली गुणवत्ता पाहता या मशीनचा वापर करणे महापालिका प्रशासनाने मनावर घेतले आहे. त्यानुसार गुरुवार पासून याचा वापर सुरु करण्यात येणार आहे. ज्या परिसरात हवा जास्त खराब आहे, तिथे प्राधान्य दिले जाणार्र आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार, पुणे परिसरातील हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) सोमवारी दुपारी 4 वाजता 315 पर्यंत पोहोचला. ही नोंद वाकडमधील भूमकर चौकात करण्यात आली. भूमकर चौकात रविवारी AQI 300 नोंदला होता, म्हणजेच एका दिवसातच हवेची गुणवत्ता अधिक बिघडली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात दिवाळीमुळे वायुप्रदूषणात वाढ झाली असून, हवेची गुणवत्ता अतिशय खराब नोंदविण्यात आली आहे. वाकड आणि शिवाजीनगर परिसरातील हवा सर्वाधिक खराब आहे. पुण्यातील विविध भागांमध्ये हवा गुणवत्ता निर्देशांकात फरक नोंदवला गेला आहे. शिवाजीनगर येथील म्हाडा कॉलनीत हवा गुणवत्ता निर्देशांक 248 वर पोहोचला, तर पाषाणमधील पंचवटी 144, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 128, निगडी 123 आणि हडपसर 90 अशी नोंद झाली. शहरातील काही भागांत हवा अतिशय खराब तर काही भागांत मध्यम दर्जाची आहे.
मे महिन्याच्या मध्यापासूनच पाऊस सुरु झाल्याने या मशीन बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र आता शहरातील हवेची स्थिती पाहता या मशीन गुरुवार पासून सुरु करण्यात येणार आहेत. ज्या परिसरात आणि रस्त्यावर हवेची गुणवत्ता अधिक खराब आहे, अशा ठिकाणी मशीन वापरण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे.
- रवी पवार, उपायुक्त, पर्यावरण विभाग.

COMMENTS