PMC JE Exam Results 2026 | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)  भरती परीक्षेचा  निकाल आचारसंहितेनंतरच!

Homeadministrative

PMC JE Exam Results 2026 | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) भरती परीक्षेचा  निकाल आचारसंहितेनंतरच!

Ganesh Kumar Mule Jun 02, 2026 9:07 PM

decisions in the Cabinet meeting | आज १२ सप्टेंबर २०२२ रोजी मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय
Water supply | PMC pune | जलवाहिनीच्या कामामुळे शहराच्या काही भागात पाणीपुरवठा होणार विस्कळीत | जाणून घ्या  सविस्तर 
Annasaheb Waghire College Otur | किशोरवयीन मुला-मुलींचे खरे मित्र हे आई-वडील | डॉ. अनुष्का शिंदे

PMC JE Exam Results 2026 | कनिष्ठ अभियंता भरती परीक्षेचा  निकाल आचारसंहितेनंतरच!

| महापालिका प्रशासन ECI कडे पत्र पाठवणार नाही

 

PMC JE Bharti 2026 – (The Karbhri News Service) – पुणे महापालिका कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या १६९ जागांसाठीच्या भरती परीक्षेचा निकाल आदर्श आचारसंहितेत अडकला आहे. निवडणूक विभागाने दिलेल्या संदिग्ध उत्तरामुळे महापालिका प्रशासनाने थेट भारत निवडणूक आयोगाकडे धाव घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र महापालिका आयुक्तांनीच ECI कडे पत्र पाठवण्यास नकार देत ‘निकाल आचारसंहितेत घोषित करता येणार नाही’ असे स्पष्ट आदेश दिले आहेत. त्यामुळे आता हा निकाल २२ जून नंतर म्हणजे आचारसंहिता संपल्यानंतरच लागणार हे स्पष्ट झाले आहे.  (Pune Municipal Corporation – PMC JE Recruitment Exam Results)

निवडणूक विभागाचे ‘संदिग्ध’ उत्तर

निकाल जाहीर करण्याबाबत महापालिकेने जिल्हा निवडणूक विभागाकडे विचारणा केली होती. मात्र, विभागाकडून  ढोबळ व संदिग्ध उत्तर आले. त्यामुळे निकाल जाहीर करावा की थांबवावा, याबाबत प्रशासनाची कोंडी झाली होती.

आयुक्तांनीच फेटाळला ECI कडे जाण्याचा प्रस्ताव

निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसार आचारसंहिता काळात असे निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेता येते. त्यानुसार महापालिकेने  जिल्हाधिकारी कार्यालयाला पत्र पाठवले होते. मात्र विभागाने संदिग्ध उत्तर दिले होते. त्यानंतर भारत निवडणूक आयोगाकडे महापालिका निवडणूक विभागामार्फत पत्र पाठवण्याचा निर्णय झाला व त्याची फाइल आयुक्तांकडे सादर करण्यात आली. मात्र महापालिका आयुक्तांनीच पत्र पाठवण्यास नकार देत आचारसंहितेत निकाल देता येणार नाही, असे आदेशित केले.

 हजारो उमेदवार टांगणीला

कनिष्ठ अभियंता पदाच्या १६९ जागांसाठी महापालिकेला ४१ हजार अर्ज आले होते. मात्र प्रत्यक्ष परीक्षेला केवळ ५० टक्के उमेदवार उपस्थित राहिले. परीक्षा होऊन महिना उलटला तरी निकाल जाहीर न झाल्याने हजारो उमेदवार संभ्रमात आहेत. “आचारसंहिता हा प्रशासनाचा विषय आहे. आम्ही परीक्षा दिली आहे, त्यामुळे निकाल तरी जाहीर करा,” अशी आर्त मागणी उमेदवार करत आहेत. अनेक उमेदवार इतर नोकऱ्यांच्या संधी नाकारून या निकालाच्या प्रतीक्षेत आहेत.

आता २२ जून नंतर आचारसंहिता संपल्यानंतरच निकालाचा मार्ग मोकळा होणार आहे. तोपर्यंत उमेदवारांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: