PMC 75th Anniversary | पुणे आणि पिंपरी महापालिका यांच्यात रंगणार क्रिकेट सामना!
| महापालिकेच्या वर्धापनदिना निमित्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन
| सहभागी होण्याचे उपायुक्त किशोरी शिंदे यांचे आवाहन
Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये अधिकारी व कर्मचारी यांनी सहभागी होण्याचे आवाहन उपायुक्त किशोरी शिंदे (Kishori Shinde PMC) यांनी केले आहे. (Pune Municipal Corporation – PMC)
पुणे महानगरपालिकेचा ७५ वा वर्धापनदिन दिनांक १५ फेब्रुवारी २०२५ रोजी माजरा होत आहे. स्थापनेचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी पुणे महानगरपालिकेकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. प्रतिवर्षी वर्धापनदिना निमित्त पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडीयम याठिकाणी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. यंदाच्या वर्षी पुणे महानगरपालिका व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्यामध्ये वर्धापनदिनी क्रिकेट सामना आयोजित करण्यात येणार आहे. (PMC Sport Department)
पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचारी यांचेसाठी शनिवार, दिनांक १५.०२.२०२५ रोजी विविध खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले आहे. स्पर्धांमध्ये सहभागी होणेसाठी पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील कार्यरत अधिकारी / कर्मचारी यांनी आपली नावे १४.०२.२०२५ अखेर दुपारी २.०० वाजेपर्यंत क्रीडा विभाग कार्यालय, पंडित नेहरू स्टेडीयम, स्वारगेट, पुणे-३० येथे लेखी अर्जाद्वारे कळवावीत. असे आवाहन क्रीडा विभागाने केले आहे.
: असे असतील सामने
आयुक्त संघ पुणे मनपा, आयुक्त संघ पिंपरी चिंचवड मनपा, पत्रकार संघ आणि छायाचित्रकार संघ यांचेमध्ये क्रिकेट सामने हे सकाळी ९:३० पासून सुरू होतील. हे सामने पं. नेहरू स्टेडियम मैदान, येथे होतील.
बुद्धिबळ स्पर्धा (महिला व पुरुष) : सकाळी १०:००
कॅरम स्पर्धा (महिला व पुरुष ) : सकाळी ११:००
पं. नेहरू स्टेडियम, मैदान
महिलांसाठी थ्रो बॉल स्पर्धा : सकाळी १०:०० : नेहरू स्टेडियम
बॅडमिंटन (महिला व पुरुष) : कै. बाबुराव सणस मैदान
COMMENTS