PMC 75th Anniversary | पुणे महापालिकेच्या वर्धापनदिन निमित्ताने कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे तीन दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रम!
Pune Municipal Corporation 75th Anniversary – (The Karbhari News Service) – पुणे महापालिका (Pune Municipal Corporation (PMC) यंदा आपला ७५ वा वर्धापनदिन (PMC Anniversary) साजरा करत आहे. या निमित्ताने कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे पुणे महापालिका सांस्कृतिक कलामंच (PMC Sanskrutik Kalamanch) च्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस या मेजवानीचा लाभ कर्मचाऱ्यांना घेता येणार आहे. महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले (Dr Rajendra Bhosale IAS), अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी (prithviraj B P IAS) आणि मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे (Nitin Kenjale PMC) यांनी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
| उद्यापासून सुरु होतील कार्यक्रम
१४ ते १६ फेब्रुवारी या कालावधीत बालगंधर्व रंगमंदिरात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे छायाचित्र तथा हस्तचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन तीन दिवस सकाळी १० वाजल्यापासून रात्री ८ पर्यंत सुरु राहणार आहे.
१५ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते १ या कालावधीत विविध कला गुणदर्शनाचे कार्यक्रम होतील. पूजा देशमुख आणि इतर कर्मचारी हा कार्यक्रम सादर करतील. बालगंधर्व रंगमंदिरात हा कार्यक्रम असेल.
१५ फेब्रुवारी रोजी दुपारी २ ते ५ या कालावधीत बालगंधर्व रंगमंदिरात मराठी नाटक सादर करण्यात येणार आहे. मंगलदास माने, आदर्श गायकवाड आणि महापालिका कर्मचारी हे नाटक सादर करतील.
१५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ ते ८ या कालावधीत मराठी आणि हिंदी गीतांचा कार्यक्रम होईल. सचिन कदम आणि महापालिका कर्मचारी हा कार्यक्रम सादर करतील.
—
COMMENTS