PMC Deputy Commissioner | महापालिका उपायुक्त यांच्या कामकाज व्यवस्थेत बदल | किशोरी शिंदे यांच्याकडील क्रीडा तसेच सांस्कृतिक केंद्र विभाग संतोष वारुळे यांच्याकडे

Homeadministrative

PMC Deputy Commissioner | महापालिका उपायुक्त यांच्या कामकाज व्यवस्थेत बदल | किशोरी शिंदे यांच्याकडील क्रीडा तसेच सांस्कृतिक केंद्र विभाग संतोष वारुळे यांच्याकडे

Ganesh Kumar Mule Oct 03, 2025 9:31 PM

Pune PMC News | पुणे महापालिकेची फसवणूक करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करून काळ्या यादीत टाकण्याची मागणी | भाजप शहर उपाध्यक्ष तुषार पाटील यांचा आंदोलनाचा इशारा
PMC JE Bharti News | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) भरती प्रक्रियेतील पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची उद्यापासून पडताळणी  | ५४५ उमेदवार पात्र
Dr Siddharth Dhende | प्रभाग क्रमांक दोन मधील लुंबिनी बाल स्नेही उद्यानाची निर्मिती | माजी उपहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचा यशस्वी पुढाकार

PMC Deputy Commissioner | महापालिका उपायुक्त यांच्या कामकाज व्यवस्थेत बदल | किशोरी शिंदे यांच्याकडील क्रीडा तसेच सांस्कृतिक केंद्र विभाग संतोष वारुळे यांच्याकडे

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – महापालिका आयुक्त यांनी नुकतेच महापालिका उपायुक्त यांना विभाग नेमून दिले होते. मात्र पुन्हा या व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. उपायुक्त किशोरी शिंदे (Kishori Shinde PMC) यांच्याकडील क्रीडा विभाग तसेच सांस्कृतिक केंद्र विभाग काढून घेत तो उपायुक्त संतोष वारुळे (Santosh Warule PMC) यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. याबाबत महापालिका आयुक्त नवल किशोर राम (Naval Kishore Ram IAS) यांनी आदेश जारी केले आहेत. (Pune Municipal Corporation – PMC)

दरम्यान याआधी जेव्हा महापालिका आयुक्त यांनी आदेश जारी केले होते त्यावेळी शिंदे यांच्याकडील मध्यवर्ती भांडार विभागाची जबाबदारी काढून घेण्यात आली होती. त्यानंतर आता क्रीडा विभाग आणि सांस्कृतिक केंद्र विभाग देखील काढून घेण्यात आला आहे. दरम्यान आपल्या क्रीडा क्षेत्रातील योगदाना मुळे शिंदे यांना महापालिकेत रुजू करून घेण्यात आले होते. मात्र आता क्रीडा विभागच त्यांच्याकडून काढून घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान शिंदे यांच्याकडे आता फक्त मुद्रणालय आणि उपायुक्त (विशेष) या विभागाची जबाबदारी आहे. तर उपायुक्त वारुळे यांच्याकडे परिमंडळ २, माहिती आणि जनसंपर्क, सोशल मीडिया कक्ष, क्रीडा आणि सांस्कृतिक केंद्र विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.

कैलास केंद्रे यांची प्रति नियुक्तीने सहाय्यक आयुक्त पदावर नियुक्ती

दरम्यान मुख्याधिकारी गट ए मधील कैलास केंद्रे यांची राज्य सरकारच्या वतीने पुणे महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रे हे लातूर मध्ये उपायुक्त म्हणून काम पाहत होते. दरम्यान केंद्रे यांच्याकडे बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.

तर सहाय्यक आयुक्त प्रज्ञा पोतदार यांच्याकडील घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कामकाज नलिनी सूर्यवंशी यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. महापालिका आयुक्त यांनी या बाबत आदेश जारी केले आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: