Union Budget 2025 | बेरोजगार तरुणांना रोजगारासाठी ठोस तरतूद नाही | प्रथमेश आबनावे

HomeBreaking News

Union Budget 2025 | बेरोजगार तरुणांना रोजगारासाठी ठोस तरतूद नाही | प्रथमेश आबनावे

Ganesh Kumar Mule Feb 01, 2025 7:56 PM

Will tax slab change in 2024 | अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा : 1 कोटी करदात्यांना होणार फायदा
Union Buget 2025 | मोदी सरकारला छत्रपती शिवाजी महाराजांचा विसर | सचिन आडेकर
Union Budget 2022 : NIrmala Sitharaman : काय स्वस्त, काय महाग?; ‘बजेट’नंतर पैसे कुठे वाचणार, कशावरचा खर्च वाढणार…

Union Budget 2025 | बेरोजगार तरुणांना रोजगारासाठी ठोस तरतूद नाही | प्रथमेश आबनावे

 

Prathmesh Abnave – (The Karbhari News Service) – केंद्रीय अर्थसंकल्प 2025 मध्ये बेरोजगारीच्या प्रश्नावर कोणताही ठोस उपाय प्रस्तावित केलेला नाही. करसवलती आणि करमाफीच्या घोषणा करण्यात आल्या आहेत, परंतु जर नोकऱ्याच उपलब्ध नसतील, तर नागरिक कर भरणार कसे? असा  सवाल महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस  सरचिटणीस प्रथमेश आबनावे यांनी उपस्थित केला आहे. (Union Budget 2025 News)

आबनावे यांनी म्हटले आहे कि, बिहारसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत, परंतु महाराष्ट्रासारख्या देशाच्या अर्थव्यवस्थेत सर्वाधिक योगदान देणाऱ्या राज्याचा संपूर्ण विसर पडलेला आहे.

120 नवीन विमानतळ उभारण्याची घोषणा झाली आहे, पण पुण्यासाठी नव्या विमानतळाचा उल्लेखही नाही, जरी नागरी उड्डाण राज्यमंत्री स्वतः पुण्याचे खासदार असले तरी!

पायाभूत सुविधांसाठी ₹11.21 लाख कोटींची घोषणा करण्यात आली आहे, पण मागील वर्षी जाहीर केलेल्या ₹11.1 लाख कोटींपैकी प्रत्यक्षात फक्त ₹10.1 लाख कोटी खर्च करण्यात आले. याचा अर्थ सरकार फक्त घोषणा करत आहे, प्रत्यक्ष विकास होत नाही. हा अर्थसंकल्प नागरिकांसाठी नाही, तर निवडक ठेकेदारांसाठी आहे.

महागाई कमी करण्यासाठी कोणतीही ठोस योजना नाही शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी कोणतीही योजना जाहीर करण्यात आलेली नाही.

या अर्थसंकल्पातून बेरोजगार तरुण, शेतकरी, मध्यमवर्गीय नागरिक आणि महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यांना पूर्णपणे दुर्लक्षित करण्यात आले आहे. या अन्यायकारक आणि दिशाहीन अर्थसंकल्पाचा तीव्र निषेध करते! असे आबनावे यांनी म्हटले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0