PMC JE Promotion | 45 वर्षे पूर्ण केलेल्या कनिष्ठ अभियंत्यांच्या हक्काच्या पदोन्नतीला प्रशासनाकडून विलंब!   | लोकप्रतिनिधींच्या सूचनांकडेही दुर्लक्ष केल्याचा अभियंत्याचा आरोप

Homeadministrative

PMC JE Promotion | 45 वर्षे पूर्ण केलेल्या कनिष्ठ अभियंत्यांच्या हक्काच्या पदोन्नतीला प्रशासनाकडून विलंब! | लोकप्रतिनिधींच्या सूचनांकडेही दुर्लक्ष केल्याचा अभियंत्याचा आरोप

Ganesh Kumar Mule Jun 10, 2026 7:53 AM

Pune PMC News | खाऊ पासून मुले वंचित राहणर नाहीत  | उपायुक्त किशोरी शिंदे यांची माहिती 
Pune PMC News | पुणे महापालिकेची फसवणूक करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करून काळ्या यादीत टाकण्याची मागणी | भाजप शहर उपाध्यक्ष तुषार पाटील यांचा आंदोलनाचा इशारा
PMC 75th Anniversary | पुणे आणि पिंपरी महापालिका यांच्यात रंगणार क्रिकेट सामना! | महापालिकेच्या वर्धापनदिना निमित्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन

PMC JE Promotion | 45 वर्षे पूर्ण केलेल्या कनिष्ठ अभियंत्यांच्या हक्काच्या पदोन्नतीला प्रशासनाकडून विलंब!

| लोकप्रतिनिधींच्या सूचनांकडेही दुर्लक्ष केल्याचा अभियंत्याचा आरोप

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) –  पुणे महानगरपालिकेत शाखा अभियंत्यांच्या पदोन्नतीला एक महिना उलटून गेला असतानाही 45 वर्षे पूर्ण केलेल्या पात्र कनिष्ठ अभियंत्यांच्या पदोन्नतीबाबत प्रशासनाकडून अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. संबंधित पदोन्नती प्रस्ताव अद्याप महापालिका आयुक्तांकडे सादरच करण्यात आलेला नसल्याची माहिती समोर आली आहे. शासन निर्णय आणि सेवाप्रवेश नियमावलीनुसार पात्र कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळणे अपेक्षित असताना प्रशासनाच्या दिरंगाईमुळे संबंधित अभियंत्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

या प्रकरणी प्रशासनाकडे लेखी पत्रव्यवहार करून तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली होती. मात्र सामान्य प्रशासन विभागाने या पत्राची कोणतीही दखल न घेतल्याने तसेच लोकप्रतिनिधींच्या सूचनांकडेही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे.

दीर्घकाळापासून प्रतीक्षेत असले अभियंते
45 वर्षे पूर्ण केलेले अनेक कनिष्ठ अभियंते दीर्घकाळापासून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहेत. शासन निर्णय आणि सेवाप्रवेश नियमावलीनुसार पात्र कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळणे अपेक्षित असताना प्रशासनाच्या दिरंगाईमुळे संबंधित अभियंत्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
अभियंत्यांचे म्हणणे आहे की, शाखा अभियंत्यांच्या पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण होऊनही कनिष्ठ अभियंत्यांचा प्रश्न प्रलंबित ठेवण्यात आला आहे. यामुळे त्यांच्या करिअरवर आणि मनोबलावर परिणाम होत आहे.

तातडीने प्रस्ताव सादर करण्याची मागणी
महानगरपालिका प्रशासनाने या विषयाची तात्काळ दखल घेऊन पदोन्नती प्रस्ताव महापालिका आयुक्तांकडे सादर करावा आणि पात्र कनिष्ठ अभियंत्यांना न्याय द्यावा, अशी मागणी संबंधित अभियंत्यांकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, सामान्य प्रशासन विभागाच्या उपायुक्त किशोरी शिंदे यांना याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले कि, संबंधित विषयाचे सगळे संदर्भ तपासून प्रस्ताव पुढे सादर करू.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: