Sunil Shinde | NUHM कर्मचाऱ्यांचे 3 महिन्यांपासून वेतन थकीत |  राष्ट्रीय मजदूर संघ आणि नगरसेवक सुनील शिंदे यांचा महापालिका आयुक्तांना इशारा

Homeadministrative

Sunil Shinde | NUHM कर्मचाऱ्यांचे 3 महिन्यांपासून वेतन थकीत |  राष्ट्रीय मजदूर संघ आणि नगरसेवक सुनील शिंदे यांचा महापालिका आयुक्तांना इशारा

Ganesh Kumar Mule Jun 09, 2026 9:28 PM

Kothrud Traffic | कोथरुड मधील वाहतूक समस्यांसंदर्भात दर आठवड्याला बैठक | वाहतूक समस्यांसंदर्भात सर्वांना एक व्हॉट्सॲप नंबर द्या! |  चंद्रकांतदादा पाटील यांचे निर्देश
Prashant Jagtap | Pune Rain | नालेसफाई घोटाळा झाला नसल्याचे सिद्ध करून दाखवा | प्रशांत जगताप यांचे देवेंद्र फडणवीस यांना आव्हान
PFI Vs BJP | पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) या संस्थेवर बंदी घाला | पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणार्‍या देशद्रोहींवर कठोर कारवाई करा | पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना पुणे शहर भाजप ने दिले निवेदन

Sunil Shinde | NUHM कर्मचाऱ्यांचे 3 महिन्यांपासून वेतन थकीत |  राष्ट्रीय मजदूर संघ आणि नगरसेवक सुनील शिंदे यांचा महापालिका आयुक्तांना इशारा

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत [NUHM] पुणे महापालिकेत कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या डॉक्टर, नर्स, ब्रदर्ससह इतर कर्मचाऱ्यांचे गेल्या 3 महिन्यांपासून वेतन प्रलंबित आहे. यासंदर्भात राष्ट्रीय मजदूर संघ [RMS] आणि कॉंग्रेस  नगरसेवक सुनील शिंदे यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन तातडीने बैठक घेऊन प्रश्न सोडवण्याची मागणी केली आहे. (PMC Health Department)

राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष तथा नगरसेवक सुनील शिंदे यांनी रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्य शासनाकडून वेतनाची तरतूद होऊनही महापालिकेमार्फत वेतन वितरणात विलंब होत आहे. यामुळे कर्मचाऱ्यांवर आर्थिक अडचणींची वेळ आली आहे.

 

गेल्या 3 महिन्यांपासून नियमित वेतन मिळालेले नाही.  विविध प्रोत्साहन भत्ते 8 ते 9 महिन्यांपासून थकीत आहेत. यात UHND, HWC, मोबिलिटी भत्ता, बाह्य लसीकरण सत्र यांचा समावेश आहे.निवडणूक कामकाजासाठी करण्यात आलेल्या कामाचे मानधन किंवा त्या दिवसाचे वेतन अद्याप दिले गेले नाही.वेतन वेळेवर होण्यासाठी आवश्यक ती तरतूद करावी.

राष्ट्रीय मजदूर संघाच्या नेतृत्वाखाली आज संबंधित कर्मचारी महापालिका कार्यालयात एकत्र आले होते. शिंदे यांनी कर्मचाऱ्यांच्या वतीने आयुक्तांना निवेदन सादर करून, पुढील 2 ते 3 दिवसांत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी केली.

या वेळी संघटनेचे उपाध्यक्ष सिताराम चव्हाण, लक्ष्मण मासाळ, सुप्रिया गवळी, कविता पाटोळे, सुनिता सरवगोड आणि रेणुका राठोड उपस्थित होते.

महापालिका आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन 2-3 दिवसांत बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले, अशी माहिती शिंदे यांनी दिली. तसेच कर्मचाऱ्यांची होणारी हेळसांड थांबवण्यासाठी उपाययोजना करण्याचेही त्यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते तातडीने न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही संघटने दिला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: