Union Budget 2025 | अपेक्षेप्रमाणे निराशाजनक अंदाजपत्रक देशाच्या आर्थिक भविष्याबाबत चिंता वाढू लागली – मोहन जोशी
Mohan Joshi Congress – (The karbhari News Service) – केंद्र सरकारचे सन २०२५-२६ चे अंदाजपत्रक अपेक्षेप्रमाणे पूर्ण निराशाजनक असून. देशाच्या आर्थिक भवितव्याबाबत आता चिंता वाटू लागली आहे. कॉंग्रेस राजवटीत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळात देशाचा विकास दर सदैव ८ टक्के होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात हा विकास दर घसरत राहिला, आता विकासदर अंदाजे ६ टक्क्यांच्या आसपास राहील असा आभास निर्माण केला जात आहे. अशी प्रतिक्रिया मोहन जोशी, उपाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी यांनी व्यक्त केली आहे. (Budget 2025 News)
जोशी म्हणाले, यातून कोट्यावधी रोजगार निर्मिती होऊन लघु व मध्यम उद्योगांना चालना मिळेल, शेतीत प्रगती होईल, निर्यात वाढेल अशी सुतराम शक्यता नाही. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळात डॉलरच्या तुलनेत रुपया ५५ रुपये झाल्यावर ‘रुपया आयसीयू मध्ये गेला’ अशी जहरी टीका नरेंद्र मोदी व भाजपवाले करीत होते. त्यांच्याच काळात आता डॉलरच्या तुलेनेत रुपया ८६ रुपयांवर घसरला आहे. हे वास्तव असताना हि ५ ट्रिलियन इकोनॉमीच्या गर्जना मोदी सरकार करीत आहे ही निव्वळ धूळफेक आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर १०० वर्षांनी आपली अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकाची होणार असे खोटे चित्र मोदी सरकार दाखवत आहे. वास्तविक डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान राहिले असते तर आजच आपली अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकाची झाली असती. आजच्या अंदाजपत्रकामुळे देशातील मध्यमवर्गीय, कामगार, श्रमिक, शेतकरी, शेतमजूर, महिला, युवक अशा साऱ्या जनतेची महागाई, टंचाई, बेरोजगारी यातून सुटका नाही हे स्पष्ट होत असून. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हाती देशाचे आर्थिक भविष्य सुरक्षित नाही याची जाणीव प्रकर्षाने होते. असे जोशी यांनी सांगितले.
COMMENTS