PMC Officers | पुणे महापालिकेत अभियंता संवर्गात मोठे फेरबदल | दोन अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त जबाबदारी

Homeadministrative

PMC Officers | पुणे महापालिकेत अभियंता संवर्गात मोठे फेरबदल | दोन अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त जबाबदारी

Ganesh Kumar Mule Jun 09, 2026 9:11 PM

PMC HRA Circular | पुणे महापालिका कर्मचारी, अधिकाऱ्यांना सुधारित दराने घरभाडे भत्ता देण्याबाबत परिपत्रक जारी! 
PMC Employees Voting | बारामती लोकसभेसाठी मतदान करणाऱ्या पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना मतदानासाठी सवलत | मात्र मतदान करून 11 वाजेपर्यंत महापालिकेत यावे लागणार 
IAS Dr Kunal Khemnar | महापालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना इंडियन स्वच्छता लीगच्या कामात सहभागी होण्याचे आदेश

PMC Officers | पुणे महापालिकेत अभियंता संवर्गात मोठे फेरबदल | दोन अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त जबाबदारी

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) –  पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनातील अभियंता संवर्गात प्रशासकीय सोयीसाठी बदल करण्यात आले आहेत. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या आदेशानुसार 9 जून  रोजी हे आदेश निर्गमित करण्यात आले. (PMC Engineering Cadre)

महापालिका आयुक्त कार्यालयाच्या आस्थापना विभागाकडून काढण्यात आलेल्या आदेश नुसार, अभियंता संवर्गातील दोन अधिकाऱ्यांच्या विभागांमध्ये बदल आणि अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.

विशाल केशव हरीभक्त, अधिक्षक अभियंता (स्थापत्य)     यांची भवन रचना विभागातून बदली करून त्यांच्याकडे मलनि:सारण, देखभाल व दुरुस्ती विभागाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.
बिपीन शिंदे , कार्यकारी अभियंता (स्थापत्य)     यांच्याकडे असलेला बांधकाम विभाग आणि नदीपात्र विकास प्रकल्प यांचा कार्यभार काढून घेऊन, त्यांच्याकडे भवन रचना विभाग आणि नदीपात्र विकास आणि  अधिक्षक अभियंता (स्थापत्य) यांचा प्रभारी पदभार देण्यात आला आहे.
गोजारे दिनकर भाऊ, अधिक्षक अभियंता (स्थापत्य) यांच्याकडे मलनि:सारण, देखभाल व दुरुस्ती विभागाचा प्रभारी खाते प्रमुख म्हणून काम पाहण्याची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे.

संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने नव्या पदाचा कार्यभार स्वीकारून अहवाल सादर करावा, अशा सूचना आदेशात देण्यात आल्या आहेत.

—

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: