PMC Ward Structure Objections and Suggestions | प्रारूप प्रभाग रचनेवर आतापर्यंत २५३७ हरकती आणि सूचना | हरकत घेण्यासाठी उद्या शेवटचा दिवस

Homeadministrative

PMC Ward Structure Objections and Suggestions | प्रारूप प्रभाग रचनेवर आतापर्यंत २५३७ हरकती आणि सूचना | हरकत घेण्यासाठी उद्या शेवटचा दिवस

Ganesh Kumar Mule Sep 03, 2025 9:27 PM

Pune Fire | नगर रस्ता,वडगाव शेरी येथील भंगार मालाच्या गोडाउनला भीषण आग
Pimpari Chinhwad Congress | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची चिंचवड विधासभेवर दावेदारी
Deccan Gymkhana Chitale Corner Pune | डेक्कन जिमखान्या जवळील चितळे कॉर्नरचा वाढदिवस | नवीन वर्षाची सुरुवात एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाने!

PMC Ward Structure Objections and Suggestions | प्रारूप प्रभाग रचनेवर आतापर्यंत २५३७ हरकती आणि सूचना | हरकत घेण्यासाठी उद्या शेवटचा दिवस

| प्रभाग क्रमांक ३, १५, २४, आणि प्रभाग क्रमांक ३४ या प्रभागातून सर्वात जास्त हरकती-सूचना

 

PMC Election 2025 – (The Karbhari News Service) – पुणे महापालिका निवडणुकी प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. तसेच त्यावर नागरिकांना हरकती आणि सूचना देण्यासाठी ४ सप्टेंबर दुपारी ३ पर्यंत कालावधी देण्यात आला आहे. त्यानुसार नागरिकांनी प्रतिसाद देणे सुरू केले आहे. आतापर्यंत प्रशासनाकडे २५३७ हरकती आणि सूचना आल्या आहेत. अशी माहिती उपायुक्त प्रसाद काटकर (Prasad Katkar PMC) यांनी दिली. (Pune Corporation Election 2025)

मात्र इतर कुठल्या प्रभाग पेक्षा  प्रभाग क्रमांक ३, १५, २४, आणि प्रभाग क्रमांक ३४ या प्रभागातून सर्वात जास्त हरकती-सूचना आल्या आहेत. तर नगर रोड वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालय ७७७ आणि निवडणूक कार्यालयाकडे सर्वात जास्त म्हणजे ९९३ हरकती आल्या आहेत.

महापालिका निवडणूक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार प्रभाग ३ अर्थात विमाननगर लोहगाव प्रभागात आतापर्यंत ७०७ हरकती सूचना आल्या आहेत. त्यातील ४४६ हरकती २ सप्टेंबर या दिवशी आल्या आहेत. तर २५० हरकती या ३ सप्टेंबरला आल्या आहेत. त्या खालोखाल प्रभाग क्रमांक ३४ म्हणजे नर्हे वडगाव बुद्रुक या प्रभागातून ५९० हरकती सूचना आल्या आहेत. त्यातील २४२ हरकती ३ सप्टेंबर या दिवशी आल्या आहेत. खराडी वाघोली प्रभागातील ९६, येरवडा गांधीनगर ५८, औंध बोपोडी ४४, मांजरी बुद्रुक साडे सतरा नळी २२८, हडपसर सातववाडी ८६, कमला नेहरू हॉस्पिटल रास्ता पेठ २३६, धनकवडी कात्रज डेअरी ५१ अशा हरकती आणि सूचना आल्या आहेत.

२२ ऑगस्ट पासून हरकती नोंदवण्यात सुरुवात झाली असली तरी २५ पासून हरकती देण्याचा  वेग वाढला.. अशा आतापर्यंत एकूण २५३७ हरकती आणि सूचना दाखल झाल्या आहेत.

दरम्यान हरकती आणि सूचना या प्रभागच्या नावात बदल करणे, काही परिसर आपल्या प्रभागातून काढून दुसरीकडे जोडणे, नैसर्गिक हद्द बदलणे अशा प्रकारच्या आहेत.
हरकती घेण्यासाठी आता उद्या शेवटचा दिवस आहे. त्यानंतर हरकती वर सुनावणी होणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: