Pune Water cut News | ३ वाजेपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होणार | मुख्य सभेत अतिरिक्त आयुक्त यांच्याकडून खुलासा

Homeadministrative

Pune Water cut News | ३ वाजेपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होणार | मुख्य सभेत अतिरिक्त आयुक्त यांच्याकडून खुलासा

Ganesh Kumar Mule Apr 24, 2026 12:23 PM

PMC Merged Villages Water Supply | 32 गावांकरीता पाणी पुरवठा योजना तयार करताना 21 टीएमसी पाणी उपलब्ध करुन द्या | महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती यांचे आदेश 
PMC Additional Commissioner | पुणे महापालिकेला रिक्त जागांवर दोन अतिरिक्त आयुक्त लवकरात लवकर मिळावेत!
Pune Water Issue | पाण्याची गळती रोखून पुणे शहराला पुरेसे पाणी उपलब्ध करून देणार | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Pune Water cut News | ३ वाजेपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होणार | मुख्य सभेत अतिरिक्त आयुक्त यांच्याकडून खुलासा

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – दुरुस्तीच्या कामासाठी महापालिका पाणीपुरवठा विभागाकडून गुरुवारी पाणी बंद ठेवण्यात आले होते. मात्र शुक्रवारी देखील पाणी आले नाही. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागले. याचे पडसाद महापालिका मुख्य सभेत उमटले. यावर अतिरिक्त आयुक्तांनी खुलासा केला कि काही कामे अपूर्ण राहिली आहेत. ही कामे दुपारपर्यंत पूर्ण होतील. त्यानंतर ३ वाजेपासून पाणीपुरवठा सुरळीत होईल. (Pune Water Supply)

शुक्रवारच्या मुख्य सभेत पाणीपुरवठा विस्कळीत झाला, त्याबाबत नगरसेवक कुणाल टिळक यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर स्वरदा बापट, धनश्री कोल्हे आदी नगरसेवकानी प्रश्न उपस्थित केले. त्यावर महापालिका अतिरिक्त आयुक्त पवनी कौर यांनी स्पष्टीकरण दिले.

विविध ४५ प्रकारची महत्त्वाची कामे या बंद काळात करण्याचे आम्ही नियोजन केले होते. मात्र गुरुवारी सकाळी ६ वाजेपर्यंत ही कामे पूर्ण झाली नाहीत. त्यामुळे पाणी येण्यास उशीर झाला. १२ वाजेपर्यंत जलशुद्धीकरण केंद्र (WTP) आणि वितरण व्यवस्थेशी संबंधित तब्बल ४५ प्रकारची तांत्रिक कामे पूर्ण केली जातील. यामध्ये जुन्या पाईपलाईनची दुरुस्ती, व्हॉल्व्ह बदलणे यांसारख्या कामांचा समावेश आहे. मात्र पर्वती पर्यंतचा फ्लो मीटर बसवण्याचे काम पूर्ण झाले नाही. ही कामे दुपार पर्यंत पूर्ण होऊन ३ वाजेपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत सुरू होईल. शहरातील उंच भागातील कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा लवकरच सुरळीत होईल, असेही नमूद करण्यात आले आहे.

खाजगी टँकरवर प्रशासनाचा वचक; नवे नियम लागू

नुकत्याच झालेल्या खाजगी टँकरच्या अपघातात दोन निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याने प्रशासनाने टँकर माफियांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. आता टँकरसाठी नवीन ‘SOP’ (प्रमाणित कार्यप्रणाली) तयार करण्यात येत आहे.

कठोर नियम: प्रत्येक टँकरवर कॅमेरा आणि हेल्पर असणे अनिवार्य करण्यात आले आहे.

GPS ट्रॅकिंग: टँकरचा मार्ग आणि वेग तपासण्यासाठी सर्व टँकर्सना GPS प्रणालीने जोडले जाणार आहे.

पाण्याचे स्रोत: टँकरचालकांनी पाणी नेमके कुठून भरले, याचे अधिकृत स्त्रोत सांगावे लागणार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: