Ganesh Kalyankar NCP | कंत्राटी कामगारांच्या हजेरीपासून वेतनापर्यंत तपासणी करा; ठेकेदारांवर कारवाईची मागणी | नगरसेवक गणेश कल्याणकर आक्रमक

पुणे महापालिकेतील कंत्राटी कामगारांच्या कामकाजाची चौकशी करण्याची गणेश कल्याणकर यांची मागणी

HomeBreaking News

Ganesh Kalyankar NCP | कंत्राटी कामगारांच्या हजेरीपासून वेतनापर्यंत तपासणी करा; ठेकेदारांवर कारवाईची मागणी | नगरसेवक गणेश कल्याणकर आक्रमक

Ganesh Kumar Mule Nov 19, 2026 7:17 PM

Contract workers | पुणे मनपा मधील कंत्राटी कामगारांचा एल्गार
contract workers | कंत्राटी कामगारांना कायम कामगारांचा पगार द्या
Rashtriy Majdur Sangh (RMS) : Sunil Shinde : पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांचे जागरण गोंधळ आंदोलन 

Ganesh Kalyankar NCP | कंत्राटी कामगारांच्या हजेरीपासून वेतनापर्यंत तपासणी करा; ठेकेदारांवर कारवाईची मागणी | नगरसेवक गणेश कल्याणकर आक्रमक

 

PMC Contract Employees – The Karbhari News Service – पुणे महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या कामगारांच्या कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी संबंधित ठेकेदारांच्या कार्यपद्धतीची सखोल चौकशी करण्याची मागणी नगरसेवक गणेश कल्याणकर (Ganesh Kalyankar NCP) यांनी केली आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

कंत्राटी कामगारांची प्रत्यक्ष उपस्थिती, मंजूर आणि प्रत्यक्ष कामावर असलेल्या कामगारांची संख्या, नियमित हजेरी, वेतन वितरण तसेच कामाच्या गुणवत्तेची तपासणी करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली आहे. केवळ कागदोपत्री नोंदींवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष स्थळपाहणी करून वस्तुस्थिती तपासावी, असे त्यांनी म्हटले आहे.

कामगारांच्या हजेरीसाठी पारदर्शक डिजिटल प्रणाली, कामाच्या ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा आणि नियमित लेखापरीक्षण लागू करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. निविदेतील अटी व शर्तींचे उल्लंघन करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाई करावी, तसेच अनियमितता आढळल्यास संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी कल्याणकर यांनी प्रशासनाकडे केली आहे.

महापालिकेच्या सार्वजनिक निधीचा योग्य विनियोग व्हावा आणि नागरिकांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात, यासाठी या प्रकरणाची तातडीने चौकशी करून आवश्यक ती कारवाई करावी, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: