Pune Water Supply News |  शहरातील पाणीपुरवठ्याची 45 तांत्रिक कामे यशस्वीरित्या पूर्ण | पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महापौरांचे निर्देश!

Homeadministrative

Pune Water Supply News |  शहरातील पाणीपुरवठ्याची 45 तांत्रिक कामे यशस्वीरित्या पूर्ण | पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महापौरांचे निर्देश!

Ganesh Kumar Mule Apr 24, 2026 8:03 PM

Punit Balan Group | Oxyrich |  माधव जगताप यांची नोटीस चुकीची आणि बेकायदेशीर | पुनीत बालन 
PMC Pune Anniversary | महापालिका वर्धापन दिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम रद्द  | महापालिका प्रशासनाकडून परिपत्रक घेण्यात आले मागे 
MLA Fund | Sunil Tingre | सोसायट्यांमध्ये होणार आता आमदार निधीतून विकासकामे

Pune Water Supply News |  शहरातील पाणीपुरवठ्याची 45 तांत्रिक कामे यशस्वीरित्या पूर्ण | पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महापौरांचे निर्देश!

 

Pune Water Cut News – (The Karbhari News Service) –  महापौर मंजुषा नागपुरे यांनी शहरातील पाणीपुरवठा सुरळीत व अखंडित राहावा यासाठी प्रशासनास आवश्यक त्या सूचना व आदेश दिले होते. त्यानुसार पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत विविध जलशुद्धीकरण केंद्रे (WTP) तसेच मुख्य जलवाहिन्यांवरील अत्यंत महत्त्वाची तांत्रिक व देखभाल दुरुस्तीची कामे आज यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली आहेत. (PMC Water Supply Department)

शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम, कार्यक्षम व दीर्घकालीन दृष्टीने टिकाऊ करण्यासाठी ही कामे अत्यंत महत्त्वाची ठरली आहेत.

महत्त्वाची पूर्ण करण्यात आलेली कामे:

१. प्रलंबित व्हॉल्व्ह बदल कार्य:
खडकवासला धरणाच्या आउटलेटवरील (३००० मिमी) तसेच वारजे जलवाहिनीवरील (१६०० मिमी) दीर्घकाळ निकामी असलेले मुख्य व्हॉल्व्ह बदलण्यात आले आहेत. यामुळे भविष्यात संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद न करता संबंधित भागात स्वतंत्रपणे दुरुस्ती करणे शक्य होणार आहे.

१. अचूक पाणी लेखांकन (Water Audit):
पर्वती व भामा-आसखेड जलशुद्धीकरण केंद्रांवर आधुनिक ‘इनलेट वॉटर मीटर’ बसवण्यात आले आहेत. यामुळे पाणी वापर, गळती व वितरण यांचे अचूक मोजमाप होऊन व्यवस्थापन अधिक पारदर्शक व परिणामकारक होणार आहे.

१. विद्युत व तांत्रिक देखभाल कामे:
महावितरण (MSEBCL) व महानगरपालिकेच्या समन्वयातून ५ प्रमुख केंद्रांवर ४५ हून अधिक तांत्रिक व नागरी स्वरूपाची कामे यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली आहेत.

सद्यस्थिती:
आज दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व नियोजित कामे पूर्ण झाली असून, टप्प्याटप्प्याने सर्व पंपिंग स्टेशन कार्यान्वित करण्यात आले आहेत. पर्वती परिसरातील कालव्याच्या गळतीमुळे काही काळ अडथळा निर्माण झाला होता; मात्र सिंचन विभागाच्या सहकार्याने परिस्थिती नियंत्रणात आणून यंत्रणा सुरळीत सुरू करण्यात आली आहे. शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

तथापि, काही भागांमध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने होत असल्याचे निदर्शनास आले आहे. याची दखल घेत माननीय महापौरांनी मा. महापालिका आयुक्त यांना तात्काळ व प्रभावी उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले आहेत.

महापौरांच्या निर्देशानुसार सर्व पंपिंग स्टेशन व जलशुद्धीकरण केंद्रे पूर्ण क्षमतेने कार्यान्वित ठेवणे, मुख्य जलवाहिन्या व वितरण यंत्रणेची सातत्याने पाहणी करणे, गळती अथवा अडथळे तातडीने दूर करणे, तसेच कमी दाबाच्या भागांमध्ये त्वरित उपाययोजना करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पर्यायी पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

तसेच संबंधित सर्व विभागांनी परस्पर समन्वय साधून नागरिकांना नियमित व पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध करून देण्याबाबत निर्देश देण्यात आले असून, परिस्थितीचा सातत्याने आढावा घेऊन अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

नागरिकांना आवाहन: मुख्य जलवाहिन्या व जलसाठा टाक्या रिकाम्या असल्यामुळे, संपूर्ण शहरात पाणीपुरवठा पूर्ण दाबाने पूर्ववत होण्यासाठी साधारणतः ३ ते ४ तासांचा कालावधी लागू शकतो. औंध, कोथरूड, एरंडवणे तसेच पेठ भागातील नागरिकांना रात्रीपर्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

पुणे महानगरपालिका प्रशासन नागरिकांना सुरळीत व विनाअडथळा पाणीपुरवठा देण्यासाठी कटिबद्ध असून, पुणेकर नागरिकांनी संयम राखून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: