Pune Water Cut News |  पुण्यात वाढीव पाणीकपात नाही; महापौरांचे प्रशासनाला आदेश

पुण्यात वाढीव पाणीकपात न करण्याचे महापौरांचे प्रशासनाला आदेश

Homeadministrative

Pune Water Cut News |  पुण्यात वाढीव पाणीकपात नाही; महापौरांचे प्रशासनाला आदेश

Ganesh Kumar Mule Oct 27, 2026 8:19 PM

Pune Water Supply News |  शहरातील पाणीपुरवठ्याची 45 तांत्रिक कामे यशस्वीरित्या पूर्ण | पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महापौरांचे निर्देश!
Pune Water Issue | पाण्याची गळती रोखून पुणे शहराला पुरेसे पाणी उपलब्ध करून देणार | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
PMC Water Quota |  पुणे महापालिकेच्या पाणीहक्कात त्रुटी? ३४ गावांचा कोटा, पाणीगळती आणि पुनर्वापराच्या गणनेवर मुख्य अभियंत्यांचे आक्षेप

Pune Water Cut News |  पुण्यात वाढीव पाणीकपात नाही; महापौरांचे प्रशासनाला आदेश

| कालवा समितीच्या बैठकीपर्यंत सध्याची व्यवस्था कायम; पाणीकोट्याबाबतच्या बैठकीचे नियोजन पुढे ढकलले

 

Mayor Manjusha Nagpure – The Karbhari News Service |  पुणे शहरात तूर्तास कोणतीही वाढीव पाणीकपात लागू करू नये, असे आदेश महापौरांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत. कालवा समितीची बैठक होईपर्यंत सध्याची पाणीपुरवठा व्यवस्था कायम ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे पुणेकरांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. (Pune Water Supply)

पुणे शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी महापालिकेने पाटबंधारे विभागाकडे पाण्याचे अंदाजपत्रक सादर केले होते. मात्र, महापालिकेने यापूर्वीच १० टक्के पाणीकपात लागू केली असतानाही पाटबंधारे विभागाने शहरासाठी केवळ ११.३३ टीएमसी पाणीकोटा मंजूर केला आहे. शहराची प्रत्यक्ष गरज लक्षात घेता हा कोटा अपुरा असल्याची भूमिका महापालिकेकडून मांडण्यात आली आहे.

राज्य शासनाने धरणातील पाणीसाठा केवळ पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवला आहे. सध्या धरणात २४ टीएमसी पाणीसाठा असल्याचे सांगण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शहराला मागील वर्षाइतके, म्हणजेच सुमारे १६ टीएमसी पाणी मिळावे, अशी महापालिकेची अपेक्षा आहे. मात्र, मंजूर कोटा अपेक्षित पाण्यापेक्षा जवळपास ५ टीएमसीने कमी असल्याने पाणीवाटपाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान, पाण्याच्या नियोजनाबाबत निर्णय घेण्यासाठी बुधवारी आयोजित करण्यात आलेली बैठक रद्द करण्यात आली आहे. आता कालवा समितीची बैठक झाल्यानंतरच पुढील बैठक घेतली जाणार आहे. तोपर्यंत शहरात अतिरिक्त पाणीकपात लागू करू नये, असे निर्देश महापौरांनी प्रशासनाला दिले आहेत.

कालवा समितीच्या बैठकीत पुणे शहराच्या पाणीकोट्याबाबत काय निर्णय होतो, याकडे आता पुणेकरांचे लक्ष लागले आहे. शहराची पाण्याची गरज आणि मंजूर कोटा यातील तफावत दूर करण्यासाठी महापालिका प्रशासन कोणती भूमिका मांडते, हेही महत्त्वाचे ठरणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: