PMC GB | हडपसर गाडीतळ उड्डाणपूल दुरुस्तीचे काम वाहतुकीला अडथळा न करता करणार | प्रशासनाची मुख्य सभेत ग्वाही 

Homeadministrative

PMC GB | हडपसर गाडीतळ उड्डाणपूल दुरुस्तीचे काम वाहतुकीला अडथळा न करता करणार | प्रशासनाची मुख्य सभेत ग्वाही 

Ganesh Kumar Mule Apr 24, 2026 3:01 PM

PMC Employees Promotion | विशिष्ट कर्मचाऱ्यांना डोळ्यासमोर ठेऊन मोकादम पदाच्या पदोन्नतीसाठी अर्ज करण्यासाठी दुसऱ्यांदा मुदतवाढ!  | अंतिम यादी प्रसिद्ध करूनही मुदतवाढ दिल्याने आश्चर्य व्यक्त 
Shivsena Vs BJP | CAG | महानगरपालिकेत 2017 पासून झालेल्या भ्रष्टाचाराची CAG मार्फत चौकशी करण्याबाबत शिवसेनेचे आंदोलन
Plastic Seizure Action | PMC Pune | पुणे महापालिकेकडून कात्रज परिसरातील 800 किलो प्लास्टिक जप्त 

PMC GB | हडपसर गाडीतळ उड्डाणपूल दुरुस्तीचे काम वाहतुकीला अडथळा न करता करणार | प्रशासनाची मुख्य सभेत ग्वाही

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) –  हडपसर परिसरातील गाडीतळ येथील जुन्या उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. मात्र भविष्यात पाडला जाणार हा पूल आणि इथे होणाऱ्या वाहतूक  कोंडीच्या अनुषंगाने नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. यावर प्रशासनाकडून ग्वाही देण्यात आली कि, याचे काम २ ते ३ टप्प्यात केले जाणार असून वाहतुकीला अडथळा न करता समन्वय साधून हे काम केले जाणार आहे. (PMC Project Department)

विरोधी पक्षनेते निलेश निकम आणि इतर नगरसेवकांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. निकम यांनी सांगितले की, भविष्यात गाडीतळ आणि मगरपट्टा परिसरातील पूल पाडले जाणार आहेत. असे असताना मग आपण दुरस्तीचा खर्च कशासाठी करतो आहोत. तसेच इतर नगरसेवकानी मागणी केली कि परिसरात वाहतूक कोंडी होता कामा नये.

– १.५ वर्षात काम पूर्ण करण्याचे महामेट्रोचे नियोजन

यावर प्रकल्प विभागाचे प्रमुख दिनकर गोजारे यांनी खुलासा केला. ते म्हणाले, गाडीतळ पुलाचे बांधकाम हे २००३ सालचे आहे. सुरुवातीला हा पूल १० ते १२ टन वजनाच्या वाहतुकीसाठी डिझाइन करण्यात आला होता, मात्र सध्या यावरून अवजड वाहनांची मोठी वाहतूक होत आहे. ऑडिटमध्ये या पुलात काही दोष (Defects) आढळले असून, आता जॅकेटिंग आणि बेअरिंग बदलून पुलाचे आयुष्य वाढवले जाणार आहे. हे काम पुढील दीड वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महामेट्रोचे असून, वाहतुकीला कोणताही अडथळा न होता २ ते ३ टप्प्यात हे काम केले जाईल.

खर्चावरून प्रश्नचिन्ह आणि पारदर्शकतेची मागणी

दरम्यान, या प्रकल्पाबाबत काही प्रश्नही उपस्थित केले जात आहेत. जर भविष्यात जुना पूल पाडून नवीन प्रकल्प उभा राहणार असेल, तर आता त्याच्या दुरुस्तीवर मोठा खर्च कशासाठी? असा सवाल उपस्थित केला जात आहे. तसेच, निविदा प्रक्रियेत पारदर्शकता असावी आणि शहरातील ‘मिसिंग लिंक’ तसेच डी.पी. रस्ते त्वरित खुले करावेत, अशी मागणी नगरसेवकांकडून होत आहे.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: