Mayor Manjusha Nagpure on pre Monsoon Work | मान्सूनपूर्व कामे वेळेत पूर्ण करण्याचे महापौरांचे आदेश | मान्सूनपूर्व तयारीसाठी आढावा बैठक

Homeadministrative

Mayor Manjusha Nagpure on pre Monsoon Work | मान्सूनपूर्व कामे वेळेत पूर्ण करण्याचे महापौरांचे आदेश | मान्सूनपूर्व तयारीसाठी आढावा बैठक

Ganesh Kumar Mule Apr 24, 2026 7:50 AM

shivsena Pune | भगवद्गीतेच्या शिकवणीप्रमाणे जे गेले त्यांचा शोक करायचा नाही | डॉ. नीलम गोऱ्हे
PMPML Employees Diwali Bonus | पीएमपी कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसचा प्रस्ताव पुणे महापालिका आयुक्तांच्या टेबलवर पडून!
Murlidhar Mohol on Pune Potholes | क्षेत्रीय कार्यालय स्तरावर ३० टीम तयार करून शहरातील खड्डे लवकरात लवकर बुजवा  | केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे महापालिकेला निर्देश

Mayor Manjusha Nagpure on Pre Monsoon Work | मान्सूनपूर्व कामे वेळेत पूर्ण करण्याचे महापौरांचे आदेश | मान्सूनपूर्व तयारीसाठी आढावा बैठक

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – सर्व खाते प्रमुखांना चालू असलेली सर्व मान्सूनपूर्व कामे वेळेत पूर्ण करण्याचे आदेश महापौरांच्या वतीने देण्यात आले आहेत. जेणेकरून पावसाळ्यात नागरिकांना कोणत्याही नैसर्गिक आपत्तीला सामोरे जावे लागणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना  महापौर मंजुषा नागपुरे यांनी दिल्या. (PMC Disaster Management)

 

महापौर यांच्या अध्यक्षतेखाली मान्सूनपूर्व तयारीसाठी  आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.  बैठकीस अतिरिक्त आयुक्त (ज) पवनीत कौर व अतिरिक्त आयुक्त (इ) प्रजित नायर  उपस्थित होते. त्याच बरोबर विविध खात्यांचे खाते प्रमुख ही उपस्थित होते.

बैठकीमध्ये मान्सूनच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेल्या मलनि:सारण विभागाअंतर्गत मान्सून पूर्व तयारीच्या दृष्टीने चालू असलेल्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. १५ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत पुणे शहरात जी नालासफाई चालू आहे त्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. तसेच NDMA च्या अंतर्गत केंद्र सरकारकडून पुणे महानगरपालिकेसाठी जे प्रकल्प मंजूर आहेत त्या कामांच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. त्याच बरोबर आपत्ती व्यवस्थापन विभाग, रोड विभाग, पर्यावरण विभाग व इतर संबंधित विभागांचाही आढावा या बैठकीत घेण्यात आला.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: