Pune Properties Survey | | PT 3 Application | मिळकतींच्या सर्व्हेच्या कामात नागरिकांचा प्रतिसाद मिळेना | कर्मचाऱ्यांना सहन करावी लागतेय नागरिकांची अरेरावी!

HomeपुणेBreaking News

Pune Properties Survey | | PT 3 Application | मिळकतींच्या सर्व्हेच्या कामात नागरिकांचा प्रतिसाद मिळेना | कर्मचाऱ्यांना सहन करावी लागतेय नागरिकांची अरेरावी!

गणेश मुळे Jul 06, 2024 3:38 PM

Pune Property Tax | पुणेकरांना PT 3 अर्ज भरण्यासाठी महापालिका ऑनलाईन सुविधा उपलब्ध करणार | उपायुक्त माधव जगताप यांचे आश्वासन
 PT-3 application deadline extended till 15th August |  PMC took important decisions regarding 40% discount
Pune Property tax | डिसेंबर महिन्यात मिळकत कर विभागाने १०१ मिळकती केल्या सील | तर मिळवले ५२ कोटींचे उत्पन्न!

Pune Properties Survey | | PT 3 Application | मिळकतींच्या सर्व्हेच्या कामात नागरिकांचा प्रतिसाद मिळेना | कर्मचाऱ्यांना सहन करावी लागतेय नागरिकांची अरेरावी!

PMC Property tax Department- (The Karbhari News Service) – पुणे शहरातील स्व-वापराच्या निवासी मिळकतींना मिळकत करात 40% सवलतीच्या अनुषंगाने पुणे महापालिकेकडून (Pune Municipal Corporation (PMC) मिळकतीची तपासणी मोहीम सुरु करण्यात आली आहे. सुमारे 3 लाख 72 हजार मिळकतींचा सर्वे केला जाणार आहे. त्यासाठी अतिरिक्त 375 कर्मचारी विभागाला मिळाले  आहेत. मात्र आदेश मिळून 10 दिवस उलटून गेले तरी यापैकी फक्त 75 कर्मचारी विभागाकडे रुजू झाले आहेत. ही प्रशासकीय अडचण आहे तर दुसरीकडे जे कर्मचारी सर्व्हे करत आहेत, त्यांना नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळताना दिसत नाही. उलट कर्मचाऱ्यांना नागरिकांची अरेरावी सहन करावी लागत आहे. नागरिकांच्या फायद्याचा हा सर्व्हे असताना, नागरिकांचा नकारात्मक प्रतिसाद आल्याने कर्मचारी आणि मिळकतकर विभाग देखील आता हतबल झाला आहे. (Pune Property Tax)

2024-25 या आर्थिक वर्षातील देयके वितरीत केल्यानंतर PT-3 फॉर्म भरण्याची मुदत वाढविण्याबाबत मोठ्या प्रमाणात नागरिक, सामाजिक संस्था व लोकप्रतिनिधी मागणी करीत होते. अशा 3,72,440 मिळकतींचा सर्व्हे पुणे महानगरपालिकेच्या सेवकांकडून प्रत्यक्ष जागेवर जाऊन सर्व्हे करण्याचे काम 20 जून पासून चालू केले आहे.
पुणे महापालिका पूर्ण शहरभर ही तपासणी मोहीम राबवणार आहे. यात नागरिकांकडून तात्काळ PT 3 भरून घेण्यात येणार आहे. घरात स्वतः राहत असल्यासच मिळकतधारकाला सवलत मिळणार आहे. नागरिकांसाठी ही शेवटची सवलत असणार आहे. यानंतर PT 3 form भरण्याची संधी दिली जाणार नाही. मिळकतींची संख्या मोठी असल्याने आणि महिनाभरात हे काम पूर्ण करायचे उद्दीष्ट ठेवल्याने मिळकत कर विभागाला अतिरिक्त मनुष्यबळाची गरज होती. यासाठी अतिरिक्त आयुक्तांनी अतिक्रमण विभागाकडील ७५ सहाय्यक निरीक्षक, घन कचरा व्यवस्थापन विभागाकडील १५० आरोग्य निरीक्षक, पंधरा क्षेत्रिय कार्यालयातील प्रत्येकी पाच असे ७५ मोकादम आणि अन्य विभागातील ७५ टंक लिपिक उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. सर्वेक्षणाचे काम पुर्ण होईपर्यंत हे मनुष्यबळ कर आकारणी विभागाशी संलग्न राहाणार असून त्यांवर केवळ सर्वेक्षणाची जबाबदारी राहाणार आहे. त्यांना कर वसुलीचे कुठलेही अधिकार राहाणार नाहीत, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. मात्र 10 दिवस उलटून गेले तरी आता पर्यंत फक्त 75 कर्मचारी विभागाकडे उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे सर्व्हेच्या कामात गती मिळेनाशी झाली आहे.
तर दुसरीकडे जे कर्मचारी घरोघरी जाऊन सर्व्हे करत आहेत, त्यांना नागरिकांकडून मानहानी सहन करावी लागत आहे. दुपारच्या वेळी लोक दार उघडत नाहीत. उघडले तर नंतर यायला सांगतात. काही सोसायट्या तर कर्मचाऱ्यांना त्यांच्या आवारात प्रवेश नाकारतात. काही लोक मानहानीकारक बोलतात. यामुळे कर्मचारी वैतागून गेले आहेत. परिणामी सर्व्हे च्या कामात गती देखील येईनाशी झाली आहे. नागरिकांच्या फायद्यासाठी प्रशासनाने सर्व्हे सुरु केला खरा मात्र नागरिकच उदासीन दिसत असल्याने हा सर्व्हे कितपत यशस्वी होणार, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.