Ex Mayor Balasaheb Shirole | पुण्याचे माजी महापौर बाळासाहेब शिरोळे यांचे निधन
Pune News – (The Karbhari News Service) – पुण्याचे माजी महापौर बाळासाहेब शिरोळे यांचे आज सकाळी खासगी दवाखान्यात उपचारांदरम्यान निधन झाले.. त्यांच्यावर सायंकाळी ५ वाजता वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे मागे दोन मुले, सुना, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. (Pune PMC News)
कै बाळासाहेब लक्षमणराव शिरोळे पाटील (वय ९२) यांचे आज सकाळी १०.५० वाजता खाजगी दवाखान्यात निधन झाले. माजी महापौर माजी आमदार भाऊसाहेब लक्षमणराव शिरोळे यांचे ते धाकटे बंधु होते. १९७४ व १९७९ साली सलग दोन वेळा पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले होते. प्रथम वाहन व्यवहार समितीचे अध्यक्ष नंतर १९८३-८४ पुणे शहराचे महापौर म्हणून त्यांनी कार्य केले. रोज सकाळी पायी चालण्याचा व्यायाम करण्याचा अनेक वर्षाचा परिपाठ होता.
दरम्यान माजी महापौर यांच्या निधना निमित्त पुणे महापालिकेच्या कार्यालयांना एक तास अगोदर सुट्टी देण्यात आली होती.

COMMENTS