Pune Congress | Vidhansabha Election 2024 | विधानसभा निवडणुकीसाठी पुणे काँग्रेस इच्छुकांकडून मागवणार अर्ज! | 5 ऑगस्ट पर्यंत मुदत

HomeBreaking Newsपुणे

Pune Congress | Vidhansabha Election 2024 | विधानसभा निवडणुकीसाठी पुणे काँग्रेस इच्छुकांकडून मागवणार अर्ज! | 5 ऑगस्ट पर्यंत मुदत

गणेश मुळे Jul 06, 2024 1:52 PM

PMC Employees Transfer | बदल्या होऊनही महापालिका कर्मचाऱ्यांना  बदली खात्यात जावेसे वाटेना!
Pune News | महिलांवरील अत्याचारांचे विरोधात महाविकास आघाडी आक्रमक |  सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन
 Pune Congress challenge to Pune BJP from Nirbhay Bano Sabha!

Pune Congress | Vidhansabha Election 2024 | विधानसभा निवडणुकीसाठी पुणे काँग्रेस इच्छुकांकडून मागवणार अर्ज! | 5 ऑगस्ट पर्यंत मुदत 

Pune Vidhansabha Election 2024 – (The Karbhari News Service) – राज्यातील विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका सप्टेंबर – ऑक्टोबर २०२४ मध्ये होत आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या निर्देशावरून  पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस पक्षाच्या पुणे शहरातील २०८ वडगांवशेरी, २०९ शिवाजीनगर, २१० कोथरूड, २१२ पर्वती, २१४ पुणे कॅन्टॉन्मेंट, २१५ कसबा,  २११ खडकवासला, २१३ हडपसर या आठही मतदार संघातून इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज मागविण्यात आले आहेत. (Pune congress) 

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्यालय काँग्रेस भवन, शिवाजीनगर, पुणे येथे उमेदवारांना उमेदवारी अर्ज देण्यात येणार आहे. हे अर्ज उमेदवारांनी सोमवार ५ ऑगस्ट २०२४ पर्यंत पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीकडे जमा करावेत, पुढे ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडे पाठविण्यात येणार आहे. 

अशी माहिती पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.