Pune Property Tax Abhay Yojana | मिळकतकर अभय योजनेचा फायदा घेतलेल्यांपैकी निम्मे मालमत्ताधारक पुन्हा थकबाकीदार | अभय योजनेने पालिकेचे 275 कोटींचे नुकसान
| विवेक वेलणकर यांनी माहिती अधिकारात उघड केली माहिती
PMC Property tax Abhay Yojana – (The Karbhari News Service) मिळकतकराची थकबाकी वसूल व्हावी म्हणून पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation (PMC) 2020-21 आणि 2021-22 या वर्षात अभय योजना आणली होती. या योजनांमुळे महापालिकेचे 275 कोटींचे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे या योजनेचा ज्या मिळकत धारकांनी फायदा घेतला, त्यातील 98 हजाराहून अधिक लोक पुन्हा थकबाकीदार झाले आहेत. सजग नागरिक मंचाचे (Sajag Nagrik Manch) अध्यक्ष विवेक वेलणकर (Vivek Velankar) यांनी माहिती अधिकाराच्या (RTI) माध्यमातून ही माहिती उघड केली आहे. (Pune Municipal Corporation Property Tax Department)
याबाबत वेलणकर यांनी सांगितले कि, मिळकतकराची थकबाकी वसूल व्हावी म्हणून पुणे महापालिकेने 2020-21 मध्ये अभय योजना आणली होती. या योजनेचा 1 लाख 49 हजार 683 थकबाकीदार मिळकतकर धारकांनी फायदा घेतला व कर भरला. मात्र या प्रक्रियेत महापालिकेने दिलेल्या दंड व व्याजमाफी पोटी महापालिकेचे 210 कोटी रुपयांचे नुकसान झाले. महापालिकेने लगेचच 2021-22 मध्ये पुन्हा एकदा मिळकतकराची थकबाकी वसूल व्हावी म्हणून अभय योजना आणली होती. या योजनेचा 66 हजार 454 थकबाकीदार मिळकतकर धारकांनी फायदा घेतला व कर भरला. मात्र या प्रक्रियेत महापालिकेने दिलेल्या दंड व व्याजमाफी पोटी महापालिकेचे 64 कोटी रुपयांचे नुकसान झाले.
वेलणकर यांनी पुढे सांगितले कि, आम्ही त्यावेळीही या योजनांमुळे दरवर्षी प्रामाणिकपणे वेळेवर कर भरणाऱ्या नागरीकांवर याचा परीणाम होतो, अशी भिती व्यक्त केली होती; आणि थकबाकीदार सोकावतील आणि नवीन अभय योजना येईपर्यंत कर भरणार नाहीत असेही लिहिले होते. दुर्दैवाने आमची भिती खरी ठरली. महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाकडे माहिती अधिकारात मी माहिती मागितली की या अभय योजनांचा फायदा घेतलेल्यांपैकी किती मालमत्ता धारक 31 मार्च 2024 रोजी पुन्हा थकबाकीदार झाले आहेत व त्यांनी कर भरलेला आहे. आलेली माहिती अत्यंत धक्कादायक होती. 2020-21 मध्ये ज्या 1, 49, 683 थकबाकीदार मालमत्ता धारकांनी अभय योजनेचा फायदा घेतला; त्यापैकी 56 हजार 904 मालमत्ता धारक मार्च 2024 अखेर पुन्हा थकबाकीदार झाले. तर 2021-22 मध्ये ज्या 66454 थकबाकीदार मालमत्ता धारकांनी अभय योजनेचा फायदा घेतला , त्यापैकी 41 हजार 500 मालमत्ता धारक मार्च 2024 अखेर पुन्हा थकबाकीदार झाले आहेत.
——-
अभय योजनेचा फायदा घेतल्यानंतरही जे लाखभर मालमत्ताधारक पुन्हा एकदा 31 मार्च 2024 अखेर थकबाकीदार झाले आहेत, त्यांची वसूली तातडीने करावी व भविष्यात कधीही त्यांना कोणत्याही अभय योजनेचा फायदा देण्यात येऊ नये.
– विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच , पुणे