PMC Vendor Registration | बिलांमध्ये ठेकेदाराची माहिती नसल्याने बिल अदा करण्यात अडचणी | माहिती अपूर्ण असल्यास बिले स्वीकारणार नसल्याचा इशारा
Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेमध्ये सॅप संगणक प्रणालीचा वापर करून विविध विभागाकडील निविदाधारकांची बिले करण्यात येतात. सॅप संगणक प्रणालीचा वापर करून निविदाधारकांची बिले तयार करतांना निविदाधारकाची (Vendor Registration) संपूर्ण माहीत त्यासोबत जोडून येणाऱ्या फॉर्म मध्ये येते. बिले तपासणीदरम्यान असे आढळून आले आहे की अनेक बिलांमध्ये निविदाधारकाची संपूर्ण माहीत येते नाही. निविदाधारकाची (Vendor Registration) माहिती संपूर्ण माहिती नसल्यास बिले अदा करणे अडचणीचे होत आहे. त्यामुळे आगामी काळात अपुरी माहिती आली तर बिले स्वीकारणार नसल्याचा इशारा मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी दिला आहे. (Pune Municipal Corporation – PMC)
विशेषतः मालकाचे नाव, ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक, बँक तपशील इत्यादी तपशील अपुरे राहिलेले आहेत. तसेच हे देखील आढळून आले आहे की, निविदाधारकाची सॅप संगणक प्रणालीमधील आणि पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळ येथील निविदाधारकांची नोंदणी फॉर्म वरील बँक तपशील यात अनेक ठिकाणी तफावत दिसून येत आहे. त्या अनुषंगाने सर्व विभागाला सूचित करण्यात आले आहे की, सॅप संगणक प्रणालीतून निविदाधारकांची संपूर्ण माहिती योग्य प्रकारे भरून घेणे व त्यामध्ये नोंदवलेले तपशील सबंधित अधिकारी यांनी पडताळणे अनिवार्य आहे. अपूर्ण माहिती असलेल्या निविदाधारकांची माहिती सॅप रूम नं. ३३६ मध्ये जाऊन पूर्ण करून घेण्याची जबाबदारी संबंधित कार्यालयाची राहील. तसेच सॅप संगणक प्रणालीसाठी निविदाधारकांची संपूर्ण माहिती (Vendor Registration) पडताळणी केल्यानंतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या सही सह त्या फॉर्मची एक प्रत SAP विभागाकडे सादर करावी. तसेच सदर फॉर्मची स्कॅन केलेली PDF प्रत व अद्ययावत करावयाचे तपशील संबंधित विभागाच्या ई-मेल आय-डी सॅप विभागास (sap@punecorporation.org) ई-मेलद्वारे पाठविण्यात यावी.
आदेशात पुढे म्हटले आहे की, सॅप संगणक प्रणालीतील ससा ४० बिलावरील बँक तपशील व पुणे महानगरपालिककेच्या संकेतस्थळावर नोंदविलेले Vendor Registration मधील बँक तपशील जुळणे बंधनकारक आहे. सर्व माहिती एकसंध व योग्य प्रकारे नोंदविणे आवश्यक आहे. ३१ ऑक्टोबर २०२५ पासून अपूर्ण सॅप संगणक प्रणालीमधील (Vendor Registration) फॉर्म अथवा बँक तपशीलामध्ये तफावत असल्यास असल्यास बिले १ल्या परीक्षक (1st Auditor) मार्फत स्वीकारले जाणार नाहीत. बँक तपशीलामध्ये बदल फक्त संबंधित विभाग प्रमुख (HOD) यांच्या स्वाक्षरी असलेल्या पत्राद्वारेच मान्य केले जाईल. असे परिपत्रकात म्हटले आहे.

COMMENTS