MSRTC Employees | एसटी कर्मचाऱ्यांना ६ हजार रुपये दिवाळी भेट | वेतनवाढीच्या फरकाचा हप्ता आता वेतनासोबत देणार  | दिवाळी अग्रीम म्हणून १२ हजार ५०० रुपये | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Homeadministrative

MSRTC Employees | एसटी कर्मचाऱ्यांना ६ हजार रुपये दिवाळी भेट | वेतनवाढीच्या फरकाचा हप्ता आता वेतनासोबत देणार | दिवाळी अग्रीम म्हणून १२ हजार ५०० रुपये | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Ganesh Kumar Mule Oct 13, 2025 8:58 PM

Shivsena Pune | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पुण्यातील माजी नगरसेवकांसह विविध पक्षांतील पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश | शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांची पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी
DCM Eknath Shinde | नवीन गृहनिर्माण धोरणामध्ये विकसकांच्या सूचनांचा अंतर्भाव करू- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे | राज्यात 35 लाख घरे बांधण्याचे नियोजन
Shivsena Pune | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पुणे महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवणार – शहरप्रमुख प्रमोद नाना भानगिरे

MSRTC Employees | एसटी कर्मचाऱ्यांना ६ हजार रुपये दिवाळी भेट | वेतनवाढीच्या फरकाचा हप्ता आता वेतनासोबत देणार

| दिवाळी अग्रीम म्हणून १२ हजार ५०० रुपये | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

Maharashtra News – (The Karbhari News Service) – एसटीच्या सुमारे ८५ हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून ६ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा तसेच वेतन वाढीचा फरक वेतनासोबत देण्यासाठी महामंडळाला दरमहा ६५ कोटी रुपये देण्याचा आणि पात्र कर्मचाऱ्यांना दिवाळी अग्रीम म्हणून १२ हजार ५०० रुपये देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे जाहिर केला. (ST Bus )

एसटीच्या सर्व कर्मचारी संघटनांची आणि कृती समितीची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. त्यावेळी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. या बैठकीस परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव नविन सोना, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओमप्रकाश गुप्ता, परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, एस. टी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, सहसचिव राजेंद्र होळकर, विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, राज्यात अतिवृष्टीमुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकार शेतकरी बांधवांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले आहे. एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी देखील गोड झाली पाहिजे म्हणून शासनाने आज हा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर एसटीला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे आहे. एस टी महामंडळाचे उत्पन्न वाढण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यासाठी खासगी शासकीय सहभागी तत्वावर (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) एस टी महामंडळाच्या जागांचा विकास करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून ६ हजार रुपये देण्यासाठी शासनाने सुमारे ५१ कोटी रुपये अनुदान देण्याचे मान्य केले आहे. तसेच सन २०२०-२४ दरम्यानच्या वेतन वाढतील फरकाची रक्कम कर्मचाऱ्यांना दरमहा वेतना सोबत देण्यात येणार असून यासाठी शासनाने ६५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. याबरोबरच जे पात्र कर्मचारी सण अग्रीम घेण्यास इच्छुक आहेत त्यांना देखील पूर्वीप्रमाणे १२ हजार ५०० रुपये देण्यात येणार आहेत त्यासाठी शासनाकडे ५४ कोटी रुपयांची मागणी एसटी महामंडळाने केली आहे, असे श्री सरनाईक यांनी सांगितले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0