Pune Illegal Hoardings | कोथरूड, वारजे, वानवडी परिसरातील अनधिकृत होर्डिंग हटवले | पुणे महापालिका आकाशचिन्ह विभागाची कारवाई 

HomeपुणेBreaking News

Pune Illegal Hoardings | कोथरूड, वारजे, वानवडी परिसरातील अनधिकृत होर्डिंग हटवले | पुणे महापालिका आकाशचिन्ह विभागाची कारवाई 

गणेश मुळे May 16, 2024 3:33 PM

PMC Property Tax Department | उद्यापासून पुणेकरांचे नळ कनेक्शन तोडण्याची होणार कारवाई | जाणून घ्या महापालिका का उचलणार हे पाऊल? 
PMC Deputy Commissioner | उपायुक्त माधव जगताप यांच्याकडे पुन्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाची जबाबदारी | संदीप खलाटे यांच्याकडील पदभार काढला 
Hoarding in front of PMC Building | पुणे महापालिका भवनासमोर उभारलेल्या वादग्रस्त होर्डिंगवर अखेर कारवाई! 

Pune Illegal Hoardings | कोथरूड, वारजे, वानवडी परिसरातील अनधिकृत होर्डिंग हटवले | पुणे महापालिका आकाशचिन्ह विभागाची कारवाई

PMC Sky Sign Department – (The Karbhari News Service) – पुणे महापालिका आयुक्तांनी (PMC Commissioner) दिलेल्या आदेशानुसार आकाशचिन्ह विभागाने अनधिकृत होर्डिंग वर कारवाई करण्यात सुरुवात केली आहे. गुरुवारी कोथरूड, वारजे, वानवडी परिसरातील अनधिकृत 9 होर्डिंग हटवले. अशी माहिती उपायुक्त माधव जगताप (Madhav Jagtap PMC) यांनी दिली. (Pune Municipal Corporation (PMC)

घाटकोपर मुंबई येथे एक अनधिकृत जाहिरात फलक (होर्डिंग) वादळी वाऱ्यामुळे कोसळून मोठ्या दुर्घटनेस सामोरे जावे लागले.  अश्या दुर्घटना वेळीच रोखता याव्यात या अनुषंगाने आयुक्त यांनी पुणे महानगरपालिकेच्या परवाना व आकाशचिन्ह विभागास आदेश दिले होते.  त्यामध्ये अनधिकृत जाहिरात फलकांवर तसेच धोकादायक होर्डिंग, बांबूचे पहाड, बोर्ड इत्यादीवर कारवाई करून दैनंदिन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.  त्यानुसार आज  पुणे महानगरपालिका हद्दीत महापालिका सहाय्यक आयुक्त कार्यालय स्तरावर जाहिरात फलक निष्कासन कारवाई करण्यात आली असुन एकूण ९ अनधिकृत जाहिरात फलक (होर्डिंग) निष्कासित करण्यात आले आहेत. (illegal Hoardings in Pune)

तसेच धोकादायक असणाऱ्या 72 जाहिरात फलक धारकांना नोटीस पाठविण्यात आल्या आहेत.  तसेच शहरात 7 ठिकाणी धोकादायक पणे उभारलेले बांबूचे पहाड काढण्यात आले. महापालिका हद्दीतील
बेकायदेशीर पणे उभारलेले 73 बोर्ड, बँनर व फ्लेक्स व 6 झेंडे, 33 पोस्टर, 24 किआँक्स यांचेवर निष्कासन कारवाई करण्यात आली. असे आकाशचिन्ह विभागाकडून सांगण्यात आले.

अशी करण्यात आली कारवाई

The karbhari - PMC Sky sign department

पुणे महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाने विविध ठिकाणी अनधिकृत होर्डिंग वर कारवाई केली.