Pune PMC News | पुणे महापालिकेत बनावट नियुक्तीपत्राला चाप; ५ जूनपासून ‘क्यूआर कोड’ प्रणाली

Homeadministrative

Pune PMC News | पुणे महापालिकेत बनावट नियुक्तीपत्राला चाप; ५ जूनपासून ‘क्यूआर कोड’ प्रणाली

Ganesh Kumar Mule May 28, 2026 8:43 AM

Junior Engineer | PMC | कनिष्ठ अभियंता पदावर अश्विनी वाघमारे यांना नियुक्त करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
PMC recruitment | पुणे महापालिका भरती | लिपिक पदासाठी आता विद्यापीठाची पदवी आवश्यक! 
PMC Pharmacist Recruitment Results | औषध निर्माता पदाचा अंतिम निकाल घोषित | निवड यादी महापालिका वेबसाईटवर प्रसिद्ध 

Pune PMC News | पुणे महापालिकेत बनावट नियुक्तीपत्राला चाप; ५ जूनपासून ‘क्यूआर कोड’ प्रणाली

| बोगस भरती रॅकेटला आळा घालण्यासाठी मनपाचा निर्णय

| २०१४ पासून नियमित भरती बंद असतानाही फसवणुकीचे प्रकार वाढले

 

Prajit Nair IAS – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेत नोकरीचे आमिष दाखवून होणाऱ्या फसवणुकीला आळा घालण्यासाठी महापालिका प्रशासनाने मोठे पाऊल उचलले आहे. यापुढे प्रत्येक नियुक्ती पत्रावर स्वतंत्र ‘क्यूआर कोड’ छापण्यात येणार असून ५ जून पासून ही नवी प्रणाली लागू होणार आहे. अतिरिक्त महापालिका आयुक्तांनी ही माहिती दिली. (PMC Recruitment)

क्यूआर कोडमुळे तत्काळ पडताळणी

नव्या प्रणालीनुसार उमेदवाराला मिळालेल्या नियुक्ती पत्रावरील क्यूआर कोड स्कॅन केल्यावर नियुक्तीची अधिकृत माहिती तत्काळ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पत्र खरे आहे की बनावट हे काही सेकंदांत समजेल. बनावट शिक्के व अधिकाऱ्यांच्या खोट्या सह्या वापरून तरुणांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढल्याने मनपाने हा निर्णय घेतला आहे.

२०१४ पासून भरती बंद, तरी बोगस भरती सुरूच

महापालिकेतील चतुर्थ श्रेणीतील पदे वगळता नियमित भरती २०१४ पासून बंद आहे. केवळ बदली लाड पागे समिती आणि अनुकंपा तत्त्वावरील भरतीच सध्या सुरू आहे. तरीही बोगस भरती करणाऱ्या टोळ्या सक्रिय आहेत. चतुर्थ श्रेणीतील नोकऱ्यांच्या नावाखाली लाखो रुपयांची फसवणूक झाल्याची प्रकरणे समोर आली आहेत.

हुबेहूब बनावट शिक्के, ओळखणे कठीण

तज्ज्ञांना नाव घेऊन महापालिकेचे बोधचिन्ह आणि अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या हुबेहूब उमटवून बनावट नियुक्तीपत्रे तयार केली जात होती. त्यामुळे सामान्य उमेदवाराला सत्यता तपासणे कठीण झाले होते. अनेक तरुणांनी लाखो रुपये देऊनही नोकरी मिळाली नसल्याचे उघड झाले.

प्रशासनाचा इशारा

यापुढे नियुक्ती आदेशावर क्यूआर कोड नसल्यास ते पत्र बनावट समजावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. कोणत्याही मध्यस्थामार्फत पैसे देऊ नयेत. भरतीसंदर्भातील माहिती केवळ महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावरच प्रसिद्ध केली जाते, याची नोंद घ्यावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, ५ जूनपासून ही प्रणाली लागू झाल्यानंतर बोगस भरती रॅकेटला मोठा चाप बसेल, असा विश्वास महापालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0