PMC Deputy Commissioner | उपायुक्त माधव जगताप यांच्याकडे पुन्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाची जबाबदारी | संदीप खलाटे यांच्याकडील पदभार काढला
Pune PMC News – (The Karbhari News Service) – उपायुक्त माधव जगताप (Madhav Jagtap PMC) यांच्याकडे पुन्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाची (PMC Desaster Management Department) जबाबदारी देण्यात आली आहे. उपायुक्त संदीप खलाटे (Sandip Khalate PMC) यांच्याकडे या विभागाची जबाबदारी होती. मात्र महापालिका आयुक्तांनी खलाटे यांच्याकडील पदभार काढून घेत जगताप यांना आपत्ती व्यवस्थापन विभागाचा पदभार दिला आहे. (Pune Municipal Corporation – PMC)
ही देखील बातमी वाचा : PMC Deputy Commissioner | महापालिका उपायुक्त यांच्या कामकाज व्यवस्थेत बदल! | माधव जगताप यांच्याकडील आपत्ती व्यवस्थापन विभाग संदीप खलाटे यांच्याकडे!
उपायुक्त माधव जगताप यांच्याकडे परिमंडळ १ आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र यातील आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कामकाज माधव जगताप यांच्याकडून काढून घेत ते उपायुक्त संदीप खलाटे यांच्याकडे देण्यात आले होते. मात्र महापालिका आयुक्तांनी पुन्हा कामकाजाच्या सोयीसाठी आपल्या आदेशात बदल केला आहे. त्यानुसार आता उपायुक्त माधव जगताप यांच्याकडे पुन्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर उपायुक्त खलाटे यांच्याकडे अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम विभाग आणि सुरक्षा विभागाची जबाबदारी असणार आहे. तर जगताप यांच्याकडे परिमंडळ १ आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाची जबाबदारी असणार आहे.

COMMENTS