Madhav Jagtap PMC | महापालिका प्रॉपर्टी टॅक्स विभागचा अतिरिक्त पदभार उपयुक्त प्रतिभा पाटील यांच्याकडे!
| उपायुक्त माधव जगताप आहेत रजेवर
PMC Property tax Department – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागाचे ;Pune Municipal Corporation property tax Department) उपायुक्त माधव जगताप (Deputy Commissioner Madhav Jagtap PMC) हे गेल्या 4 दिवसापासून रजेवर आहेत. मात्र तरी त्यांचा पदभार कुणा अधिकाऱ्याकडे दिला नव्हता. यामुळे काही लोकप्रतिनिधी आणि स्वयंसेवी संस्थानी आक्षेप घेतला होता. त्यानुसार आता जगताप यांच्याकडील पदाचा अतिरिक्त पदभार उपायुक्त प्रतिभा पाटील (Deputy Commissioner Pratibha Patil PMC) यांच्याकडे देण्यात आला आहे. (Pune PMC News)
महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत. माधव जगताप यांनी आपली रजा आधीच मान्य करून घेतली होती. मात्र त्यांच्या पदाचा अतिरिक्त पदभार कुणाकडे देण्यात आला नव्हता. मात्र नियमानुसार पदभार देणे आवश्यक असते. याबाबत आक्षेप घेण्यात आले होते. कारण कर आकारणी बाबतचे बरेच प्रस्ताव उपायुक्त यांच्या स्वाक्षरी विना तसेच पडून आहेत. यात महापालिकेचे आर्थिक नुकसान देखील होत आहे. त्यामुळे अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार आता आयुक्तांनी आदेश जारी करत उपायुक्त जगताप यांच्याकडील पदाचा अतिरिक्त पदभार उपायुक्त पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. दरम्यान पाटील यांच्याकडे सामान्य प्रशासन विभागाची जबाबदारी आहे.
COMMENTS