PMC Ward Structure Objections and Suggestions | प्रारूप प्रभाग रचनेवर शेवटच्या दिवशी हरकती आणि सूचनांचा पाऊस!  | शेवटच्या दिवशी जवळपास सव्वा तीन हजार हरकती 

Homeadministrative

PMC Ward Structure Objections and Suggestions | प्रारूप प्रभाग रचनेवर शेवटच्या दिवशी हरकती आणि सूचनांचा पाऊस!  | शेवटच्या दिवशी जवळपास सव्वा तीन हजार हरकती 

Ganesh Kumar Mule Sep 04, 2025 8:32 PM

Divyang Employees | PMC Pune | दिव्यांग कर्मचारी आणि नागरिकांशी सलोख्याने वागा | अन्यथा कर्मचाऱ्यांवर होणार प्रशासकीय कार्यवाही 
Arun Pawar | वृक्षमित्र, समाजसेवक अरुण पवार यांना कार्य-कर्तृत्व पुरस्कार प्रदान
BJP Pune | 1 हजार जुन्या कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्यांचा किंवा कुटुंबीयांचा सन्मान करण्यात येणार  | वर्धापनदिनानिमित्त शहर भाजपचा स्नेह-मेळावा

PMC Ward Structure Objections and Suggestions | प्रारूप प्रभाग रचनेवर शेवटच्या दिवशी हरकती आणि सूचनांचा पाऊस!  | शेवटच्या दिवशी जवळपास सव्वा तीन हजार हरकती

| एकूण ५८४३ हरकती आणि सूचना आल्या

 

PMC Election 2025 – (The Karbhari News Service) – पुणे महापालिका निवडणुकी प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. तसेच त्यावर नागरिकांना हरकती आणि सूचना देण्यासाठी ४ सप्टेंबर दुपारी ३ पर्यंत कालावधी देण्यात आला होता. त्यानुसार नागरिकांनी प्रतिसाद देणे सुरू केले होते. शेवटच्या दिवशी हरकती आणि सूचनांचा अक्षरशः पाऊस पडला आहे. कारण ४ सप्टेंबर ला जवळपास सव्वा तीन हजार हरकती प्राप्त झाल्या. तर एकूण ५८४३ हरकती आणि सूचना आल्या आहेत.  अशी माहिती उपायुक्त प्रसाद काटकर (Prasad Katkar PMC) यांनी दिली. (Pune Corporation Election 2025)

मात्र इतर कुठल्या प्रभाग पेक्षा  प्रभाग क्रमांक ३४ या प्रभागातून सर्वात जास्त हरकती-सूचना आल्या आहेत. वडगाव बुद्रुक नऱ्हे या प्रभागातून २०६६ हरकती आणि सूचना आल्या आहेत.  या प्रभागासाठी शेवटच्या दिवशी १४७३ हरकती आणि सूचना आल्या.

महापालिका निवडणूक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार प्रभाग ३ अर्थात विमाननगर लोहगाव प्रभागात आतापर्यंत ८१९  हरकती सूचना आल्या आहेत. त्यातील ४४६ हरकती २ सप्टेंबर या दिवशी आल्या आहेत. तर २५० हरकती या ३ सप्टेंबरला आल्या आहेत तर आज ११२ आल्या.  खराडी वाघोली प्रभागातील ९६, येरवडा गांधीनगर ६०, औंध बोपोडी ११६, मांजरी बुद्रुक साडे सतरा नळी ५५८, हडपसर सातववाडी ९९, कमला नेहरू हॉस्पिटल रास्ता पेठ २५१, धनकवडी कात्रज डेअरी १८३, आंबेगाव कात्अरज १६८, कोंढवा खुर्द कौसर बाग १६८, कल्याणी नगर वडगाव शेरी ९६,  हरकती आणि सूचना आल्या आहेत.

२२ ऑगस्ट पासून हरकती नोंदवण्यात सुरुवात झाली असली तरी २५ पासून हरकती देण्याचा वेग वाढला.. अशा आतापर्यंत एकूण ५८४३ हरकती आणि सूचना दाखल झाल्या आहेत.

दरम्यान हरकती आणि सूचना या प्रभागच्या नावात बदल करणे, काही परिसर आपल्या प्रभागातून काढून दुसरीकडे जोडणे, नैसर्गिक हद्द बदलणे अशा प्रकारच्या आहेत.

  • क्षेत्रीय कार्यालय निहाय हरकती आणि सूचना

औंध बाणेर – १२८

भवानी पेठ – २५

बिबवेवाडी – ८६

धनकवडी सहकार नगर – १८९९

ढोले पाटील रोड – १०८

हडपसर मुंढवा – १०५

कसबा विश्रामबाग – १०

कोंढवा येवलेवाडी – २०

कोथरूड बावधन – ९

नगररोड वडगाव शेरी – १२६८

शिवाजी नगर घोले रोड – ३५

सिंहगड रोड – ६३

वानवडी रामटेकडी – २१०

वारजे कर्वे नगर – ९

येरवडा कळस धानोरी – ६८

निवडणूक कार्यालय – १८००

 

  • एकूण  – ५८४३

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: