PMC Retired Employees | फेब्रुवारी महिन्यात पुणे महापालिकेचे 39 कर्मचारी आणि अधिकारी सेवानिवृत्त
PMC Retired Employees – (The Karbhari News Service) – फेब्रुवारी, 2025 महिन्यात पुणे महापालिकेचे (Pune Municipal Corporation) 39 कर्मचारी आणि अधिकारी सेवानिवृत्त झाले. या कर्मचाऱ्यांसाठी महानगपालिका कामगार कल्याण विभागाच्या (PMC Labour Welfare Department) वतीने सेवापूर्ती समारंभ आयोजित करण्यात आला होता. (PMC Pune)
या समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून पुणे महानगरपालिकेचे उप आयुक्त (अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निर्मुलन) श्री.संदीप खलाटे उपस्थित होते. श्री. नितीन केंजळे, मुख्य कामगार अधिकारी (Nitin Kenjale PMC) यांनी कार्यक्रमाच्या प्रस्तावनेवर बोलताना सेवापुर्ती समारंभाची पार्श्वभूमी सांगून सेवकांच्या भविष्यात मिळणाऱ्या रकमा, गुंतवणूक व नियोजन याची सविस्तर माहिती दिली. तसेच कोणत्याही सेवकास काही अडचण आल्यास त्यांनी कामगार कल्याण विभागास भेट द्यावी, असे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. संदीप खलाटे यांनी निवृत्त सेवकांना मार्गदशनपर बोलताना तुम्ही आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, कुटुंबासाठी वेळ दिला पाहिजे, आपल्या इच्छा पूर्ण करून जीवनाचा आनंद घ्यावा, तसेच आपण भविष्यातील वाटचालीसाठी नियोजन करावे म्हणजे आपले उर्वरित आयुष्य सुखाचे व समृद्धीचे होईल, असे नमूद करून सर्वाना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्रमुख पाहुण्यांच्या मार्गदर्शनानंतर सर्व सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी यांना शॉल व स्मृतिचिन्ह देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मनिषा कायटे यांनी केले.
COMMENTS