PMC Ward 39 – Upper Super IndiraNagar | प्रभाग क्रमांक – ३९ – अप्पर सुपर इंदिरानगर | धनकवडी, बालाजीनगर, अप्पर सुपर इंदिरानगर असे विविध परिसर असलेल्या या प्रभागाची रचना आणि व्याप्ती जाणून घेऊया
Pune Corporation Election 2025 – (The Karbhari News Service) – धनकवडी, बालाजीनगर (पार्ट), अप्पर सुपर इंदिरानगर असे विविध परिसर या प्रभागात मोडतात. या प्रभागासाठी एकूण १०४ हरकती आल्या. अप्पर सुपर इंदिरानगर या प्रभागाची सविस्तर माहिती जाणून घेऊयात. (Pune Municipal Corporation – PMC Election 2025)
प्रभाग क्रमांक – ३९ – अप्पर सुपर इंदिरानगर
लोकसंख्या एकूण – ७५९४४- अ. जा. १४८६५ – अ. ज. – ७६८
निवडून द्यायच्या सदस्यांची संख्या – ४
व्याप्ती: धनकवडी, बालाजीनगर (पार्ट) ग्रीन एकर रेसिडेन्सी, किमया अपार्टमेंट, चैत्रबन वसाहत, देवयानी रेसिडेन्सी, नमन गॅलक्सी, चिंतामणीनगर फेज १ व २ अप्पर इंदिरानगर, अप्पर बस डेपो, विश्वकर्मा इन्स्टीटयुट ऑफ टेक्नॉलॉजी, अप्पर सुपर इंदीरानगर, अंबिकानगर, न्यू पद्मावती नगर, सिध्दार्थ नगर, विघ्नहर नगर, पी.एम.टी. सोसायटी, राजीव गांधी नगर, लेक टाऊन सोसायटी, स्टेट बँक नगर, महालक्ष्मी नगर, पुष्पा इंटरनॅशनल स्कूल, भगवान महावीर स्वामी उद्यान, इ.
उत्तर: पुणे सातारा रस्ता बालाजी नगर मधील शीतल अपार्टमेंट च्या दक्षिणेकडील पूर्व पश्चिम रस्त्यास जेथे मिळतो तेथून पूर्वेस सदर रस्त्याने न्यू गुलशन अपार्टमेंटच्या पूर्वेकडील गल्लीस मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस सदर गल्लीने गंगोत्री निवासच्या दक्षिणेकडील हद्दीस मिळेपर्यंत, तेथून पूर्वेस सदर हद्दीने आंबील ओढ्यास मिळेपर्यंत, तेथून दक्षिणेस लोअर इंदिरा नगरच्या दक्षिणेकडील हद्दीस मिळेपर्यंत, तेथून पूर्वेस सदर हद्दीने स्वामी विवेकांनद रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून दक्षिणेस स्वामी विवेकांनद रस्त्याने अप्पर इंदिरानगर चाळीच्या उत्तरेकडील हद्दीस मिळेपर्यंत, तेथून पूर्वेस अप्पर इंदिरानगर चाळीच्या उत्तरेकडील हद्दीने व पुढे पूर्वेस जानकी पथाने छत्रपती संभाजी राजे उद्यानाच्या उत्तरेकडील हद्दीस मिळेपर्यंत. तेथून पूर्वेस सदर हद्दीने गणेशनगर पुष्पम कॉलनी मधील निलकंठेश्वर मित्र मंडळाच्या पूर्वेकडील रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस व पुढे विघ्नेश्वर मित्र मंडळाच्या पूर्वेकडील रस्त्याने उत्तरेस व पुढे पश्चिमेस सदर रस्त्याने पी.एम.टी. कॉलनीच्या पश्चिमेकडील हद्दीस मिळेपर्यंत तेथून उत्तरेस सदर हद्दीने राजकुमार हनुमंत शेलार रस्त्यास मिळेपर्यंत. तेथून पुर्वेस राजकुमार हनुमंत शेलार रस्त्याने व पुढे जागडे नगर स.नं.६५० बिबवेवाडी मधील पुर्व पश्चिम रस्त्याने आईमाता मंदिराच्या पश्चिमेकडील दक्षिणोत्तर रस्त्यास मिळेपर्यंत तेथून उत्तरेस सदर रस्त्याने आईमाता मंदिराच्या उत्तर हद्दीवरील रस्त्यास मिळेपर्यंत तेथून पुर्वेस सदर रस्त्याने गंगाधामकडे जाणाऱ्या रस्त्यास मिळेपर्यंत.
पूर्व : आईमाता मंदिराच्या उत्तर हद्दीवरील रस्ता गंगाधामकडे जाणाऱ्या रस्त्यास जेथे मिळतो तेथून दक्षिणेस गंगाधाम शत्रुंजय रस्त्याने (जुन्या मनपा हद्दीने) स.नं. ६५८ (अंबिका नगर ) च्या पुर्वे हद्दीवरील रस्त्याने मौजे बिबवेवाडी व कोंढवा बुद्रुक यांच्या सामायिक हद्दीस मिळेपर्यंत.
दक्षिण: गंगाधाम- शत्रुंजय मंदिर रस्त्यास बिबवेवाडी व कोंढवा बुद्रुक यांची हद्द जेथे मिळते तेथून पश्चिमेस सदर हद्दीने व पुढे मौजे कात्रज, बिबवेवाडी यांच्या सामायिक हद्दीनेवीर बाजी पासलकर रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस वीर बाजी पासलकर रस्त्याने राजीव गांधी नगरच्या दक्षिणेकडील हद्दीस मिळेपर्यंत तेथून पश्चिमेस सदर हद्दीने व पुढे रामराज्य प्राथमिक शाळेच्या दक्षिणेकडील हद्दीने व पुढे पश्चिमेस पुष्पा इंटरनॅशनल शाळेच्या दक्षिणेकडील रस्त्याने पुष्पा इंटरनॅशनल शाळेच्या पश्चिमेकडील रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून दक्षिणेस सदर रस्त्याने मौजे कात्रज, बिबवेवाडी यांच्या हद्दीस मिळेपर्यंत (देवयानी रेसिडेन्सी सोसायटीच्या दक्षिणेकडील हद्दीने) तेथून पश्चिमेस मौजे कात्रज, मौजे बिबवेवाडी यांच्या हद्दीने आंबील ओढ्यास मिळेपर्यंत.
पश्चिमः मौजे कात्रज व मौजे बिबवेवाडी यांची हद्द आंबील ओढ्यास जेथे मिळते तेथून दक्षिणेस आंबील ओढ्याने लेकटाऊन सोसायटीच्या दक्षिणेकडील हद्दीस मिळेपर्यंत तेथून पश्चिमेस लेक टाऊन सोसायटीच्या पश्चिमेकडील आंबील ओढ्यास मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस आंबील ओढ्याने बालाजी नगर मधील सिद्धी हॉस्पिटलच्या दक्षिणेकडील पूर्वपश्चिम रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून पश्चिमेस सदर रस्त्याने पुणे सातारा रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस पुणे सातारा रस्त्याने बालाजी नगरमधील शीतल अपार्टमेंटच्या दक्षिणेकडील रस्त्यास मिळेपर्यंत.

PMC Ward 39 – Upper Super IndiraNagar Map
COMMENTS