Khadakwasla Bridge Rapairing | खडकवासला पुलाची दुरुस्ती पूर्ण |  १० ते १५ वर्षांनी वाढले पुलाचे आयुष्य!

Homeadministrative

Khadakwasla Bridge Rapairing | खडकवासला पुलाची दुरुस्ती पूर्ण |  १० ते १५ वर्षांनी वाढले पुलाचे आयुष्य!

Ganesh Kumar Mule Jun 14, 2026 5:37 PM

Nana Bhangire | PMC Pune | कर संकलन (property tax) विभागातील ६० % सेवकांच्या बदल्या त्वरित करण्यात याव्यात | शिवसेना शहर अध्यक्ष प्रमोद (नाना) भानगिरे यांची मागणी 
OBC Reservation | ओबीसींना राजकीय आरक्षण लागू झाल्याबाबत पुण्यातील राजकीय पक्षांना काय वाटते?
Mhatoba Tekadi Pune  | टेकड्यांवर वनराई नष्ट करणाऱ्या टवाळखोरांवर कठोर कारवाई करा!| चंद्रकांतदादा पाटील यांचे वन विभागाला निर्देश

Khadakwasla Bridge Rapairing | खडकवासला पुलाची दुरुस्ती पूर्ण |  १० ते १५ वर्षांनी वाढले पुलाचे आयुष्य!

|  वाहतुकीची क्षमता  वाढल्याने जड वाहतूक सुरू होणार

 

PMC Project Department – (The Karbhari News Service) –  खडकवासला धरणाखाली मुठा नदीवरील 60 वर्षे जुना पूल आता नव्या जोमाने वाहतुकीसाठी सज्ज झाला आहे. सुमारे 2 कोटी रुपये खर्चून केलेल्या दुरुस्ती आणि बळकटीकरणामुळे पुलाचे आयुष्य पुढील 10 ते 15 वर्षांनी वाढले आहे. पावसाळ्यापूर्वीच काम पूर्ण करून पूल लवकरच जड वाहतुकीसाठी खुला होणार आहे. अशी माहिती महापालिका प्रकल्प विभागाच्या वतीने देण्यात आली.

1965 चा पूल होता धोकादायक स्थितीत

खडकवासला आणि शिवणे परिसराला जोडणारा 160 मीटर लांबी आणि 6.5 मीटर रुंदीचा हा पूल 1965 मध्ये बांधण्यात आला होता. हा परिसर पुणे मनपात समाविष्ट झाल्यानंतर प्रकल्प विभागाने केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये पुलाची स्थिती अत्यंत खराब असल्याचे आढळले. तज्ज्ञ सल्लागारांच्या तपासणीत काँक्रीटची क्षमता M-15 ते M-17 पर्यंत घसरल्याचे समोर आले. त्यामुळे तातडीने पूल जड वाहतुकीसाठी बंद करून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले.

काय कामे झाली?

चार महिने चाललेल्या या कामात पुलाची ताकद वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला:

पिअर जॅकेटिंग – धरणातून सोडल्या जाणाऱ्या प्रचंड वेगाच्या पाण्याचा मारा पिलर्सवर होत असल्याने त्यांचे जॅकेटिंग करून बळकटीकरण केले.

काँक्रीट पुनर्संचयन – 50 वर्षांपेक्षा जास्त वयामुळे झिजले जुने काँक्रीट काढून त्याऐवजी पॉलिमर मॉर्टर वापरून नवीन काँक्रीट भरले.

इपॉक्सी ग्राउटिंग – स्लॅब आणि पिलरची ताकद वाढवण्यासाठी पॉलिमर मॉर्टरनंतर इपॉक्सी ग्राउटिंग करण्यात आले.

अबेटमेंट आणि विंग वॉल पॉइंटिंग – दोन्ही बाजूंच्या आधारस्तंभांचे आयुष्य वाढवण्यासाठी विशिष्ट मटेरियलने सांधे भरले.

सुरक्षा उपाय – नागरिकांच्या सुरक्षेसाठी दोन्ही बाजूला चेनलिंक फेन्सिंग, खडकवासला बाजूला W-Beam क्रॅश बॅरियर बसवले.

री-सरफेसिंग आणि रोड फर्निचर – पाण्याचा निचरा होण्यासाठी डांबरीकरण आणि दिशादर्शक फलकांचे काम पूर्ण झाले.

 

महापालिका आयुक्त नवल किशोर राम आणि अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली, मुख्य अभियंता (प्रकल्प) दिनकर गोजारे यांच्या नियंत्रणाखाली हे काम पूर्ण झाले.

पोलिस वाहतूक विभागाच्या समन्वयाने कामादरम्यान पूल जड वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. दुरुस्तीनंतर आता पूल सुरक्षितपणे वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.

 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: