BRTS | Standing Committee | विश्रांतवाडी – फुलेनगर मार्गावरील बीआरटी हटविण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीची मंजुरी

Homeadministrative

BRTS | Standing Committee | विश्रांतवाडी – फुलेनगर मार्गावरील बीआरटी हटविण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीची मंजुरी

Ganesh Kumar Mule Jun 12, 2026 9:46 PM

Pedestrian Day Pune | पुणे महापालिका आयोजित पादचारी दिनाला चांगला प्रतिसाद! | पादचारी समस्यां बाबत अभ्यास करून DPR बनविण्याच्या महापालिका आयुक्त यांच्या सूचना 
PMC Helpline | आता पाण्याबाबतच्या तक्रारी करा 24 तास | महापालिकेकडून 1 मार्च पासून हेल्पलाईनची सुविधा
Pune Education News | गाडकवाडी गाव “विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या” माध्यमातून झाले चकाचक! | गावच्या वतीने स्मृतीचिन्ह देऊन केला शिबिरार्थींचा यथोचित सन्मान!”

BRTS | Standing Committee | विश्रांतवाडी – फुलेनगर मार्गावरील बीआरटी हटविण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीची मंजुरी

| नागरिकांना मोठा दिलासा

 

Suhas Tingare NCP – (The Karbhari News Service) – विश्रांतवाडी परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी विश्रांतवाडी येथील साठे बिस्कीट चौक ते चंद्रमा हॉटेल (डेक्कन कॉलेज चौक) दरम्यानची बीआरटी मार्गिका हटविण्याबाबतचा प्रस्ताव पुणे महानगरपालिका स्थायी समितीच्या बैठकीत मांडण्यात आला होता. या प्रस्तावाला स्थायी समिती ने मंजुरी दिली आहे. (Pune PMC News)

विश्रांतवाडी चौक ते फुलेनगर रोड या गजबजलेल्या मार्गावरील बीआरटी मार्गिका काढून टाकण्याचा प्रस्ताव पुणे महापालिकेच्या स्थायी समितीकडे सादर करण्यात आला होता. राष्ट्रवादी कांग्रेस चे नगरसेवक सुहास टिंगरे यांनी हा प्रस्ताव दिला होता. वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण वाढल्याने स्थानिक नागरिक, व्यापारी व वाहनचालकांकडून ही मागणी होत आहे.  असे प्रस्तावात म्हटले होते. यावर आता प्रशासनाकडून अभिप्राय सादर करण्यात आला. पथ विभागाने म्हटले आहे की, पुणे आळंदी रस्ता येथील बीआरटी काढून टाकल्यानंतर बस आणि इतर वाहनांना दोन लेन खुल्या होणार आहेत. ते नागरिकांच्या सोयीचे होणार आहे.

या प्रस्तावाच्या अनुषंगाने २० एप्रिल २०२६ रोजी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली होती. त्यानंतर विविध विभागांचे अभिप्राय व तांत्रिक बाबींचा विचार करून आज झालेल्या पुणे महानगरपालिका स्थायी समितीच्या बैठकीत हा ठराव मंजूर करण्यात आला आहे.

या निर्णयामुळे या मार्गावरील वाहतूक सुरळीत होण्यास मोठी मदत होणार असून नागरिकांना वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळणार आहे.  लवकरच संपूर्ण बीआरटी मार्गिका हटविण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

या विषयाचा सातत्याने पाठपुरावा करून नागरिकांच्या मागणीला न्याय मिळवून देण्यात यश आले आहे. परिसरातील नागरिक, व्यापारी व वाहनचालक यांच्याकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.

——-

माजी आमदार सुनिल टिंगरे यांच्या सूचनेनुसार हा प्रस्ताव मांडण्यात आला होता. या कामांमुळे विश्रांतवाडी, साठे बिस्कीट चौक, डेक्कन कॉलेज चौक तसेच परिसरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक अधिक सुलभ होऊन नागरिकांचा वेळची बचत होणार आहे.

सुहास विजय टिंगरे, सदस्य, स्थायी समिती, पुणे महानगरपालिका

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: