PMC Ward 37 – Dhankavadi Katraj Dairy | प्रभाग क्रमांक ३७ – धनकवडी – कात्रज डेअरी | या प्रभागाची व्याप्ती आणि रचना सविस्तर जाणून घ्या

Homeadministrative

PMC Ward 37 – Dhankavadi Katraj Dairy | प्रभाग क्रमांक ३७ – धनकवडी – कात्रज डेअरी | या प्रभागाची व्याप्ती आणि रचना सविस्तर जाणून घ्या

Ganesh Kumar Mule Sep 12, 2025 8:05 PM

National Film Awards | राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारातून इंदिरा गांधी आणि नर्गिस दत्त यांची नावे वगळल्याचा निषेध
Pune Lok Sabha Constituency | Pune Congress | काँग्रेस कडून पुणे लोकसभा समन्वयक पदाची जबाबदारी विश्वजित कदम यांच्याकडे!
Annabhau Sathe Vikas Mahamandal | साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे महामंडळाच्या योजनांच्या लाभासाठी मेळाव्याचे आयोजन

PMC Ward 37 – Dhankavadi Katraj Dairy | प्रभाग क्रमांक ३७ – धनकवडी – कात्रज डेअरी | या प्रभागाची व्याप्ती आणि रचना सविस्तर जाणून घ्या

 

PMC Election 2025 – (The Karbhari News Service) – महापालिका प्रारूप प्रभाग रचनेतील धनकवडी कात्रज डेअरी हा ३७ क्रमांकाचा प्रभाग. धनकवडी संपर्क कार्यालय. मंदार सोसायटी, गुलाबनगर,चैतन्यनगर. कलानगर असे विविध परिसर या प्रभागात मोडतात. या प्रभाग विषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात. (Pune PMC Election 2025)

 

प्रभाग क्रमांक ३७ – धनकवडी – कात्रज डेअरी

लोकसंख्या एकूण -८८२५३ – अ. जा. -६७६८ – अ.ज.-८२९

निवडून द्यायच्या सदस्यांची संख्या – ४

 

व्याप्ती: धनकवडी संपर्क कार्यालय. मंदार सोसायटी, गुलाबनगर,चैतन्यनगर. कलानगर, जगदीश सोसायटी. राघवनगर, धनकवडी टेलिफोन एक्सचेंज, नित्यानंद सोसायटी. राऊतबाग, संभाजीनगर, धनकवडी गावठाण, प्रतिभानगर, कमल विहार सोसायटी, प्रियदर्शनी हायस्कूल, भारती रुग्णालय, भारती विद्यापीठ, कात्रज डेअरी, दीनदयाल नगर इ.

उत्तर: त्रिमुर्ती हौसिंग सोसायटी व मॉर्डर्न सोसायटी यांचेमधील हद्दीची सरळ रेषा पांचगांव पर्वतीच्या हद्दीस जेथे मिळते, तेथून पूर्वेस त्रिमुर्ती हौसिंग सोसायटी व मॉर्डर्न सोसायटीच्या यांचेमधील हद्दीने व पुढे रस्त्याने व पुढे धनकवडी जुन्या मनपा हद्दीवरील रस्त्याने तीन हत्ती चौक ओलांडून पुढे विष्णूपंत अप्पा जगताप रस्त्याने पुणे सातारा रस्त्यास मिळेपर्यंत.

पुर्वः विष्णूपंत अप्पा जगताप रस्ता पुणे सातारा रस्त्यास जेथे मिळतो तेथून दक्षिणेस पुणे सातारा रस्त्याने कात्रज चौकात कात्रज देहू रोड बायपास रस्त्यास मिळेपर्यंत.

दक्षिण: कात्रज देहूरोड बायपास रस्ता कात्रज चौकात पुणे सातारा रस्त्यास मिळतो तेथून पश्चिमेस कात्रज देहूरोड बायपास रस्त्याने मौजे कात्रज व मौजे आंबेगाव बुद्रुक यांचे हद्दीवरील रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस सदर रस्त्याने पीआयसीटी येथील त्रिमूर्ती चौकात आंबेगाव बुद्रुक व धनकवडी हद्दीवरील रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून पश्चिमेस व पुढे उत्तरेस सदर हद्दीवरील रस्त्याने व पुढे पश्चिमेस जिजाऊ निवास, सुगम निवास आणि त्रिमुर्ती निवास यांचे मिळकतीच्या दक्षिणेकडील रस्त्याने मौजे आंबेगांव बु. मधील स. नं. २१ ते २६ च्या पश्चिमे कडील रस्त्यास मिळेपर्यंत.

पश्चिमः  जिजाऊ निवास, सुगम निवास आणि त्रिमुर्ती निवास यांचे मिळकतीच्या दक्षिणेकडील रस्ता मौजे आंबेगांव बु. मधील स. नं. २१ ते २६ च्या पश्चिमे कडील रस्त्यास जेथे मिळतो, तेथून उत्तरेस मौजे आंबेगांव बु च्या जुन्या मनपा हद्दीने व पुढे पांचगांव पर्वती आणि मौजे आंबेगांव बु. यांचे हद्दीने मौजे धनकवडी व पांचगांव पर्वती यांचे हद्दीस मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस पांचगांव पर्वती व मौजे धनकवडी यांच्या हद्दीने त्रिमुर्ती हौसिंग सोसायटी व मॉर्डर्न सोसायटीच्या यांचेमधील हद्दीच्या सरळ रेषेस मिळेपर्यंत.

 

The Karbhari - PMC Ward 37 PMC Election 2025

PMC Ward 37 – Dhankavadi Katraj Dairy Map

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: