PMC Draft Ward Structure Hearing | प्रारूप प्रभाग रचनेत राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वाचे उल्लंघन | महापालिका प्रारूप प्रभाग रचनेवर नागरिक आणि लोकप्रतिनिधी कडून आक्षेप
| दोन दिवस चालली सुनावणी | प्रभाग रचना त्रयस्त संस्थेकडून करण्याची मागणी
PMC Draft Ward Structure Suggestions and Objections – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर 22 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर यादरम्यान हरकती व सूचना मागवण्यात आलेल्या होत्या. यामध्ये प्राप्त झालेल्या हरकती सूचनांवर 11 व 12 सप्टेंबर 2025 रोजी प्राधिकृत अधिकारी व्ही. राधा (अप्पर मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई) यांचे उपस्थितीत बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणी सुनावणी घेण्यात आली. या प्रसंगी महापालिका आयुक्त तथा प्रशासक नवल किशोर राम, अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे, उपायुक्त निवडणूक प्रसाद काटकर उपस्थित होते. (Pune Municipal Corporation – PMC Election 2025)
यावेळी एकूण ५९२२ हरकती प्राप्त झाल्या. त्या पैकी एकूण ८२८ हरकतदार उपस्थित राहिले व त्यांनी त्यांचे म्हणणे मांडले .या मध्ये सर्वात जास्त प्रभाग ३४ मध्ये एकूण २१३७ हरकती प्राप्त झाल्या आणि त्यापैकी केवळ ७७ हरकतदार उपस्थित राहिले.
प्रभागनिहाय हरकती
१) हरकती – २३ | हजर – ७ | सामाईक – १
२) हरकती – १० | हजर – ५ | सामाईक – २
३) हरकती – ८१९ | हजर – ५१ | सामाईक – १३
४) हरकती – ११६ | हजर – ३ | सामाईक – २
५) हरकती – ९६ | हजर – ५ | सामाईक – ४
६) हरकती – ६३ | हजर – १९ | सामाईक – ३
७) हरकती – १२७ | हजर – ३४ | सामाईक – ६
८) हरकती – १२५ | हजर – १५ | सामाईक – ३
९) हरकती – ७ | हजर – ५ | सामाईक – २
१०) हरकती – ३ | हजर – २ | सामाईक – १
११) हरकती – ११ | हजर – ३ | सामाईक – १
१२) हरकती – ७ | हजर – ४ | सामाईक – १
१३) हरकती – ५१ | हजर – १६ | सामाईक – ३
१४) हरकती – ७७ | हजर – १५ | सामाईक – ६
१५) हरकती – ५६४ | हजर – ३० | सामाईक – ३
१६) हरकती – ९९ | हजर – २४ | सामाईक – १
१७) हरकती – ५५ | हजर – ९ | सामाईक – ३
१८) हरकती – ६० | हजर – २९ | सामाईक – ६
१९) हरकती – २०१ | हजर – ६० | सामाईक – ४
२०) हरकती – ४७ | हजर – १९ | सामाईक – ३
२१) हरकती – ५० | हजर – २९ | सामाईक – २
२२) हरकती – ८६ | हजर – १४ | सामाईक – ५
२३) हरकती – ३३ | हजर – ३२ | सामाईक – ६
२४) हरकती – ३७१ | हजर – ८५ | सामाईक – ३
२५) हरकती – १ | हजर – २ | सामाईक – १
२६) हरकती – १४ | हजर – १२ | सामाईक – ३
२७) हरकती – १२ | हजर – ६ | सामाईक – २
२८) हरकती – ४ | हजर – ३ | सामाईक – १
२९) हरकती – ० | हजर – २ | सामाईक – १
३०) हरकती – ५ | हजर – ७ | सामाईक – १
३१) हरकती – १ | हजर – १ | सामाईक – १
३२) हरकती – १३ | हजर – ११ | सामाईक – ३
३३) हरकती – २१ | हजर – १० | सामाईक – ५
३४) हरकती – २,१३७ | हजर – ७७ | सामाईक – १२
३५) हरकती – ३६ | हजर – १ | सामाईक – १
३६) हरकती – ७ | हजर – ३ | सामाईक – २
३७) हरकती – १९२ | हजर – ६ | सामाईक – ४
३८) हरकती – २०० | हजर – ७६ | सामाईक – १०
३९) हरकती – १०४ | हजर – १७ | सामाईक – ५
४०) हरकती – १४ | हजर – १ | सामाईक – ३
४१) हरकती – ३७ | हजर – २८ | सामाईक – ३
४२ (सामाईक) हरकती – २३ | हजर – ५० | सामाईक – १
पुणे महानगरपालिकेच्या २०२५ च्या संपूर्ण प्रारूप प्रभाग रचनेस शिवसेना नेते प्रशांत बधे यांची हरकत
प्रभाग क्रमांक १ कळस- धानोरीहा प्रभाग मागच्या वेळी होता तसाच आहे ह्याच्यात फार काही बदल नाही त्याला दोन्ही तिन्ही बाजूंनी पिंपरी चिंचवड हद्द आहे.
प्रभाग क्रमांक २ फुलेनगर- नागपूर चाळ हा प्रभाग कारण नसताना वेडा वाकडा केला आहे टिंगरे नगरचा भाग याला जोडला आहे भौगोलिक सलगता असताना सुद्धा वेळा वाकडा प्रभाग आखला आहे.
प्रभाग क्रमांक ३ विमाननगर- लोहगाव या प्रभागात कारण नसताना खुळेवाडी श्री पार्क विमानतळाच्या समोरील भाग काढून पुणे नगर राष्ट्रीय महामार्ग ओलांडून चार नंबर प्रभागाला जोडला आहे.
प्रभाग क्रमांक ४ खराडी- वाघोली कारण नसताना वाघोली गावाची दोन तुकडे केले आहेत राष्ट्रीय महामार्गाच्या अलीकडच्या भागाला चार नंबर प्रभागात आणि पलीकडच्या भागाला तीन नंबरच्या प्रभागात असे गावाचे दोन तुकडे केले आहेत जेणेकरून समाविष्ट गावातून लोकप्रतिनिधी निवडून येऊ नये याची पूर्णपणे खबरदारी घेतली आहे तसेच पुणे नगर राष्ट्रीय महामार्ग ओलांडून खुळेवाडीचा भाग या प्रभागाला जोडला आहे.
प्रभाग क्रमांक ५ कल्याणीनगर- वडगावशेरी या प्रभागाला एका बाजूला मुळा मुठा नदी दुसऱ्या बाजूला पुणे नगर राष्ट्रीय महामार्ग आहे एवढी नैसर्गिक आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वाच्या विरोधात जाऊन हायवे ओलांडून Hermes हेरिटेज हा भाग या प्रभागाला जोडला आहे.
प्रभाग क्रमांक ६ येरवडा- गांधीनगर हा प्रभाग पूर्वी एका बाजूला नदी दुसऱ्या बाजूला खडकी कॅन्टोन्मेंटचे हद्द आणि तिसऱ्या बाजूला गोल्फ क्लब अशी होती परंतु चारी नगरसेवक विरोधी पक्षाचे असल्यामुळे अक्षरशः या प्रभागाची चार तुकडे केले आहेत भरीत भर म्हणून अर्धी नदी सुद्धा त्याला जोडली आहे आणि अर्धा बंडगार्डनपुल जोडला आहे.
प्रभाग क्रमांक ७ गोखलेनगर- वाकडेवाडी – या प्रभागात कुठेही भौगोलिक सलगता दिसत नाही पंचवटी टेकडीचा डोंगर ओलांडलेत पाषाण रस्ता ओलांडलाय बाणेर रस्सा ओलांडलाय गणेश खिंड रस्ता ओलांडलाय नदी ओलांडली रेल्वे लाईन ओलांडून संगमवाडी व येरवडा गावात हा प्रभाग गेलाय एकूण तीन विधानसभा मतदारसंघात हा प्रभाग विस्तारलाय याला वॉर्ड ऑफिस सुद्धा तीन आहेत घोले रोड, औंध आणि येरवडा त्यामुळे प्रशासकीय कामात सुद्धा अडचण येणार आहे, या प्रभागात असणार एसटीचा आरक्षण हे कमी होणार आहे.
प्रभाग क्रमांक ८ औंध- बोपोडी या प्रभागात फारसे काही बदल करता आले नाहीत कारण एका बाजूला खडकी कॅन्टोन्मेंट आहे आणि दुसऱ्या बाजूला नदी आहे यातून अभिमान श्री, सकाळनगर, सिंध हाऊसिंग सोसायटी हे वगळण्यात आले आहे.
प्रभाग क्रमांक ९ सुस- बाणेर- पाषाण या प्रभागात सुस, म्हाळुंगे ही नव्याने समाविष्ट झालेली गावे आहेत या प्रभागात दोन जागा SC व ST साठी राखीव होऊ शकतात.
प्रभाग क्रमांक १० बावधन- भुसारी कॉलनी या प्रभागात बावधन बुद्रुक आणि बावधन खुर्द ही दोन्ही गावे एकत्र केलीत परंतु वाघोली चे दोन तुकडे केलेत, यात डावी आणि उजवी भुसारी कॉलनी घेतली आहे.
प्रभाग क्रमांक ११ रामबाग कॉलनी- शिवतीर्थनगरया प्रभागाला नैसर्गिक दृष्ट्या लागून असलेला भाग एक झोपडपट्टी या प्रभागातनं काढून दुसऱ्या प्रभागात टाकली त्यामुळे हा प्रभाग सुरक्षित केला गेला आहे.
प्रभाग क्रमांक १२ छत्रपती शिवाजीनगर- मॉडेल कॉलनी या प्रभागाला नैसर्गिक दृष्ट्या जोडून असलेला प्रभात रोड भांडारकर रोड हा भाग काढून नरवीर तानाजी वाडी विद्यापीठ रस्त्याच्या पलीकडील भाग जोडला आहे तसेच सीओईपी मुख्य न्यायाधीश बंगला हा भाग सुद्धा कारण नसताना जोडला आहे या प्रभागातून एससी च आरक्षण काढण्यासाठी अनैसर्गिक जोडला आहे.
प्रभाग क्रमांक १३ – पुणे स्टेशन- जय जवान नगर – हा प्रभाग कसबा विधानसभा कॅन्टोन्मेंट व वडगाव शेरी विधानसभा असा विभागला आहे निवडणुका झाल्यानंतर काम करताना प्रशासकीय अडचणी खूप येणार आहेत याला वॉर्ड ऑफिस सुद्धा तीन आहेत कसबा, ढोले पाटील आणि येरवडा भौगोलिक सलगता असताना सुद्धा कारण नसताना मुळा मुठा नदी ओलांडून नदीपलीकडील येरवडा गाव, जुनी खडकी हा भाग याला जोडला आहे काय कारण आहे कळतच नाही त्यामुळे प्रभाग क्रमांक सहाचे तीन तुकडे करून टाकले आहेत का तर तिथे शिवसेनेचे उमेदवार निवडून येतातप्रभाग क्रमांक 24 मधील एका नेत्याला जो भाग नकोय तो सर्व भाग या 13 नंबरच्या प्रभागाला जोडला आहे कारण या प्रभागात कायम विरोधी पक्षाचे काँग्रेसचे उमेदवार निवडून येतात पूर्णपणे सत्ताधारी पक्षाच्या लोकांना डोळ्यासमोर ठेवून ही प्रभाग रचना केली आहे.
प्रभाग क्रमांक १४ कोरेगाव पार्क- मुंढवा या प्रभागात भौगोलिक सलगता राखली आहे.
प्रभाग क्रमांक १५ – मांजरी बुद्रुक-साडेसतरा नळी – हा प्रभाग केशवनगर साडे सतरा नळी मांजरी आणि शेवाळवाडी असा पुणे शहरात समाविष्ट नवीन गावांचा केला आहे यात कारण नसताना मुळा मुठा नदी ओलांडून खराडीतला काही भाग या प्रभागात घेतला आहे तसेच पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग ओलांडून शेवाळवाडी गाव यात घेतले आहे भौगोलिक सलगता असताना सुद्धा माळवाडीचा संपूर्ण भाग या प्रभागातून वगळला आहे आणि खराडीचा व शेवाळवाडी चा भाग जोडला आहे याला काय कारण आहे.
प्रभाग क्रमांक १६ हडपसर- सातववाडी हा प्रभाग सुद्धा कारण नसताना पुणे सोलापूर रस्ता क्रॉस करून अमर सृष्टी ही सोसायटी व त्या जवळील भाग या प्रभागात घेतलाय भौगोलिक सलगता पाहिली तर सोलापूर रस्त्याने सरळ जाऊन लक्ष्मी कॉलनी शेवाळवाडी पर्यंत हा प्रभाग सलग करता आला असता.
प्रभाग क्रमांक १७ रामटेकडी- माळवाडी हा प्रभाग सुद्धा रामटेकडी पुणे सोलापूर रस्त्याच्या एका बाजूला आहे आणि माळवाडी, मगरपट्टा सिटीचा काही भाग, सुंदर संकुल साधना विद्यालय आकाशवाणी अण्णासाहेब मगर महाविद्यालय हा भाग पुणे सोलापूर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला आहे भौगोलिक सलगता असताना सुद्धा वेडेवाकडे प्रभाग करण्याचं कारण काय आहे याला हडपसर गाव जोडता आल असतं.
प्रभाग क्रमांक १८ वानवडी- साळुंखे विहार या ठिकाणी सुद्धा पुणे सोलापूर रस्ता ओलांडून हा प्रभाग कवडे रोड सोपान बाग डोबरवाडी हडपसर इंडस्ट्रियल इस्टेट हा भाग जोडला आहे.
प्रभाग क्रमांक १९ कोंढवा खुर्द- कौसर बाग या प्रभागात भौगोलिक सलगता राखली आहे.
प्रभाग क्रमांक २० बिबेवाडी- महेश सोसायटी प्रभाग क्रमांक 21 हा एका पदाधिकाऱ्यासाठी करत असताना वीस मधील काही सलग भाग 21 ला जोडण्यात आलाय.
प्रभाग क्रमांक २१ मुकुंदनगर- सॅलेसबरी पार्क – स्वारगेट चौक ते कोंढवा रोड ज्योती हॉटेल ते आई माता मंदिर तिथून परत गंगाधाम चौकातून बिबवेवाडी कोंढवा रोडने मार्केट यार्ड परिसर परत सातारा रोड मार्गे स्वारगेट असा वेडा वाकडा प्रभाग कुणासाठी तरी जाणून-बुजून केलाय.
प्रभाग क्रमांक २२ काशेवाडी- डायस प्लॉट – हा प्रभाग रामोशी गेट नेहरू रस्ता असा सरळ येऊन लोहिया नगरला आत घेऊन संपूर्ण लोहे या नगरची वसाहत बरोबर घेऊन परत नेहरू रस्त्याने शंकर शेठ रोड ओलांडून डायस प्लॉट वरून कॅन्टोन्मेंट हद्दीने परत शंकर शेठ रोड ओलांडून अझम कॅम्पस महात्मा फुले रस्ता जुना मोटर स्टॅन्ड भवानी माता मंदिर मार्गे रामोशी गेटला आणला आहे भौगोलिक सलगता असताना सुद्धा हा प्रभाग मुख्य रस्ता ओलांडून डायस प्लॉटला नेला आहे खरंतर डायस प्लॉट चा भाग सॅलसबरी पार्कला जोडायला हवा होता त्यामुळे सॅलेसबरी पार्कला सुद्धा एक जागा एससीला मिळाली असती.
प्रभाग क्रमांक २३ रविवार पेठ- नाना पेठ – हा प्रभाग लाल महालापासून सुरू होऊन गणेश रोडने दारूवाला पूल डुल्या मारुती अल्पना टॉकीज अरुणा चौक निवडुंग विठोबा मंदिर त्यामागील वस्ती आझाद आळी कादर चौक क्वार्टर गेट राजेवाडी रामोशी गेट निशात टॉकीज कॅन्टोन्मेंट हद्दीने महात्मा फुले रस्ता जुना मोटर स्टॅन्ड भवानी माता मंदिर रामोशी गेट भवानी पेठ कस्तुरी चौक महाराणा प्रताप रस्त्याने मिर्झा गालिब रोड नेहरू चौकातून सरळ लक्ष्मी रोड ओलांडून पासोड्या विठोबा शिवाजी रस्ता मार्गे परत लाल महाल असा लांबलचक कुठलीही भौगोलिक सलगता लक्षात न घेता शेजारचा एक प्रभाग चांगला करायचा नादात बाकीचे सगळे प्रभाग बिघडून ठेवलेत.
प्रभाग क्रमांक २४ कमला नेहरू हॉस्पिटल- रास्ता पेठ – हा प्रभाग करताना शनिवार वाड्यापासून सुरुवात करून अलोकनगरी, त्रिमूर्ती मंडळ, कागदीपुरा, कुंभारवाडा, पवळे चौक, काचीमळा, रेल्वे भराव वस्ती, सत्तार खान चाळ, विठोबा सोसायटी, इंदिरानगर, भीमनगर येथे एससी एसटी ची तसेच मुस्लिम लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे भौगोलिक सलगता असताना सुद्धा हा भाग या प्रभागातून तोडण्यात आला आहे त्यामुळे या प्रभागात कायम पहिल्यापासून एक जागा एससी साठी राखीव असायची ती आता हेतू पुरस्कर कमी केलेली आहे सलग असलेला भाग तोडल्यामुळे हा प्रभाग नेहरू रस्ता ओलांडून लाल देऊळ साचापीर स्ट्रीट तसेच पदमजी गेट पर्यंत गेला आहे हा प्रभाग करताना भारतीय जनता पक्षाच्या एका नेत्याला डोळ्यासमोर ठेवून केला आहे त्याला पाहिजे तसा तोडला आहे आणि त्याला पाहिजे तसा जोडला आहे एक टोक शनिवार वाड्याला आणि दुसरे तो टोक पदमजी गेट आहे राज्य सरकारच्या प्रभाग रचनेच्या नोटिफिकेशनला हरताळ फासला आहे.
प्रभाग क्रमांक २५ शनिवार पेठ- महात्मा फुले मंडई हा प्रभाग भौगोलिक सलगता ठेवून केलाय.
प्रभाग क्रमांक २६ गुरुवार पेठ- घोरपडे पेठ हा प्रभाग आखताना भौगोलिक सलगता ठेवली आहे परंतु लोहिया नगरचा मोठा वस्ती विभाग जिथे एससी लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर आहे तो वगळला आहे जेणेकरून या प्रभागात एससी च आरक्षण पडणार नाही याची काळजी घेतली आहे.
प्रभाग क्रमांक २७ नवी पेठ- पर्वती या प्रभागात भौगोलिक सलगता ठेवली आहे.
प्रभाग क्रमांक २८ जनता वसाहत- हिंगणे खुर्द दाट वस्तीचा हा प्रभाग आहे भौगोलिक सलगता आहे.
प्रभाग क्रमांक २९ डेक्कन जिमखाना- हॅपी कॉलनी या प्रभागात सुद्धा भौगोलिक सलगता आहे.
प्रभाग क्रमांक ३० हिंगणे- होम कॉलनी – हा प्रभाग सुद्धा भौगोलिक दृष्ट्या सरळ केला आहे.
प्रभाग क्रमांक ३१ मयूर कॉलनी- कोथरूड या प्रभागात सुद्धा भौगोलिक सलगता आहे.
प्रभाग क्रमांक ३२ वारजे- पॉप्युलर नगर या प्रभागात सुद्धा भौगोलिक सलगता आहे.
प्रभाग क्रमांक ३३ शिवणे- खडकवासला हा संपूर्ण प्रभाग मुठा नदीच्या अलीकडे पलीकडे असून पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या नवीन गावांचा केला आहे प्रभाग चांगला आखला आहे त्यामुळे या समाविष्ट गावातील जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य ग्रामपंचायत सदस्य या नवीन लोकांना महानगरपालिकेत लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येण्याची चांगली संधी मिळणार आहे त्या त्या गावातील काय काय समस्या आहेत हे त्यांना जास्त माहिती असतं त्यामुळे महापालिकेत समाविष्ट झाल्याचा फायदा जास्तीत जास्त विकास कामे करून त्यांना करून घेता येईल.
प्रभाग क्रमांक ३४ नऱ्हे – वडगाव बुद्रुक – या प्रभागाला भौगोलिक सलगता आहे परंतु देहू रोड कात्रज बायपास व नवले ब्रिज ते नवीन कात्रज बोगद्या पर्यंत या प्रभागाने सहा वेळा हा मुंबई बेंगलोर नॅशनल हायवे ओलांडला आहे काय कारण आहे लोकसंख्या कमी करायची होती शेवटचे दोन प्रभाग तीन तीन चे केले असते तरी चालले असते या प्रभागांचे क्षेत्रफळ एवढं मोठं आहे की लोकप्रतिनिधी आणि मतदार एकमेकांशी कसा संपर्क साधणार.
प्रभाग क्रमांक ३५ सनसिटी- माणिक बाग या प्रभागाने सुद्धा दोन ठिकाणी मुंबई बेंगलोर नॅशनल हायवे ओलांडला आहे राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन होतंय प्रभाग रचनेची मार्गदर्शक तत्वे तरी जाहीर करू नका म्हणजे हरकती तरी येणार नाहीत.
प्रभाग क्रमांक ३६ सहकारनगर- पद्मावती या प्रभागात चारी बाजूने भौगोलिक सलगता आहे.
प्रभाग क्रमांक ३७ धनकवडी- कात्रज डेअरी – हा प्रभाग करताना भौगोलिक सलगता राखलेली दिसते.
प्रभाग क्रमांक ३८ आंबेगाव- कात्रज हा प्रभाग सर्वात जास्त लोकसंख्येचा १ लाख १४ हजार ९७० चा आहे भौगोलिक सलगता न पाळता तीन ठिकाणी नॅशनल हायवे ओलांडला आहे.
प्रभाग क्रमांक ३९ अप्पर सुपर- इंदिरानगर या प्रभागात भौगोलिक सलगता आहे.
प्रभाग क्रमांक ४० कोंढवा बुद्रुक- येवलेवाडी हा प्रभाग जुना होता तसाच आहे समाविष्ट गावांचा भौगोलिक सलगता असलेला प्रभाग आहे.
प्रभाग क्रमांक ४१ महंमदवाडी- उंड्री – हा प्रभाग करताना कात्रज ते कोंढवा ते सासवड रस्ता असा दोन्ही बाजूला अर्धा अर्धा प्रभाग आहे जुनी हद्द थोडी व समाविष्ट गावांची हद्द जास्त असा भौगोलिक सलगता असलेला प्रभाग केला आहे.
पुणे महानगरपालिकेने सादर केलेली प्रारूप प्रभाग रचना राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वाप्रमाणे नाही. प्रभागाच्या सीमारेषा आखताना नैसर्गिक हद्दी विचारात घेतल्या नाहीत उदाहरणार्थ नॅशनल हायवे, शहरातील मोठे रस्ते, नद्या, नाले, डोंगर, रेल्वे रूळ हे ओलांडून प्रभाग केले आहेत प्रभाग रचना करताना भौगोलिक दृष्ट्या काही प्रभागाची व्याप्ती प्रचंड मोठी झाली आहे तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्या वस्त्यांची शक्यतोवर विभाजन करू नये. असे राज्य सरकारचे निकष असताना सुद्धा मोठ्या प्रमाणात वस्त्याच्या वस्त्या वगळून टाकल्या आहेत त्यामुळे त्या प्रभागात एससी, एसटीचे आरक्षण पडणार नाही याची पूर्णपणे काळजी घेतली आहे. काही प्रभाग तर तीन तीन विधानसभा मतदारसंघात विभागले आहेत निवडणुका झाल्यानंतर प्रभागात काम करताना प्रशासकीय अडचणींना तोंड द्यावे लागणार. पाच-सहा प्रभाग तीन-तीन क्षत्रिय कार्यालयात विभागले आहेत. यातील कुठलाही एक प्रभाग दुरुस्त करायला गेलं तर पुढच्या सगळ्या प्रभागांच्या सीमारेषा बिघडतात त्यामुळे आपण पुण्याची संपूर्ण प्रारूप प्रभाग रचना नीट तपासून खात्री करून घ्यावी संपूर्ण प्रभाग रचना करताना शासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा भंग केलेला आहे. पुणे महानगरपालिका आयुक्तांनी केलेला प्रभाग रचनेचा नकाशा व त्या नकाशावर नगर विकास विभागाने केलेले बदल व त्यानंतर त्या नकाशावर निवडणूक आयोगाने केलेले बदल हे तिन्ही नकाशे आम्हाला बघायला मिळावेत. किंवा महानगरपालिकेच्या वेबसाईटवर ते उपलब्ध करावेत प्रभाग रचना करताना राजकीय हस्तक्षेपापासून दूर राहून याचे कामकाज नीट चालावे. म्हणून सरकारने कायद्यामध्ये बदल करून राज्य निवडणूक आयोगाचे अधिकार स्वतःकडे घेतले आहेत. तरीसुद्धा ही प्रभाग रचना करताना शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेचा पूर्णपणे भंग करून राजकीय सोयीची प्रभाग रचना केली आहे. प्रभाग रचना त्रयस्त संस्थेकडून कुणालाही डोळ्यासमोर न ठेवता करून घ्यावी व आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय द्यावा अन्यथा आम्हाला मेहरबान उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागतील. असा इशारा बधे यांनी दिला आहे.

COMMENTS