PMC Ward 40- Kondhwa Budruk Yevalewadi | प्रभाग क्रमांक – ४० – कोंढवा बुद्रुक – येवलेवाडी | प्रभागाच्या हद्दी आणि रचना सविस्तर जाणून घेऊया
PMC Pune Election 2025 – (The Karbhari News Service) – कोंढवा बुद्रुक – येवलेवाडी या प्रभागात कुमार पृथ्वी सोसायटी, गगन अव्हेन्यू सोसायटी, पॅलेस ओर्चेड सोसायटी, कोंढवा बु. अग्निशमन केंद्र असे विविध परिसर मोडतात. या प्रभागाची रचना आणि व्याप्ती सविस्तर जाणून घेऊयात. (Pune Municipal Corporation – PMC Election 2025)
प्रभाग क्रमांक – ४० – कोंढवा बुद्रुक – येवलेवाडी
लोकसंख्या एकूण – ७६४९८- अ. जा. ११५३१ – अ.ज. १०९७
निवडून द्यायच्या सदस्यांची संख्या – ४
व्याप्ती : येवलेवाडी, कोंढवा बुद्रुक, कपीलनगर, श्रीकुंज नगर सोसायटी, त्रिमूर्ती कॉलनी, टिळेकर नगर, कामठे पाटील नगर, शिक्षक कॉलनी, श्रद्धा नगर, टायनी औद्योगिक वसाहत, कपिलनगर, गोकुळनगर, साईनगर, सुखसागरनगर, अशरफ नगर (पार्ट). विश्वकर्मा इन्स्टिट्यूट, काकडे अंगार, इशा पर्ल सोसायटी, कुमार पृथ्वी सोसायटी, गगन अव्हेन्यू सोसायटी, पॅलेस ओर्चेड सोसायटी, कोंढवा बु. अग्निशमन केंद्र इ.
उत्तर: मौजे कात्रज व मौजे बिबवेवाडी यांची हद्द मौजे कात्रज मधील सीमा सागर सोसायटीच्या पश्चिमेकडील हद्द जेथे मिळते, तेथून पूर्वेस सदर हद्दीने मौजे कात्रज व बिबवेवाडी यांच्या हद्दीस मिळेपर्यंत, तेथून पूर्वेस सदर हद्दीने व पुढे मौजे बिबवेवाडी व मौजे कोंढवा बुद्रुक यांचे हद्दीने गंगाधाम – शत्रुंजय मंदिर रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस गंगाधाम शत्रुंजय मंदिर रस्त्याने कुमार पृथ्वी फेज २ च्या उत्तरेकडील रस्त्याच्या सरळ रेषेस मिळेपर्यंत. तेथून पूर्वेस सदर सरळ रेषेने व पुढे पूर्वेस कुमार पृथ्वी फेज २ च्या उत्तरेकडील रस्त्याने कुमार पृथ्वी फेज २ च्या पूर्वेकडील हद्दीस मिळेपर्यंत, तेथून दक्षिणेस सदर हद्दीने संत ज्ञानेश्वर नगर लेन नं. १ पर्यंत व पुढे पूर्वेस सदर लेन नं. १ ने युनिटी पार्कच्या उत्तर व पूर्व हद्दीस मिळेपर्यंत, तेथून दक्षिणेस सदर रस्त्याने मौजे कोंढवा बुद्रुक मौजे कोंढवा खुर्द यांचे हद्दीस मिळेपर्यंत, तेथून पूर्वेस सदर हद्दीने आश्रफ नगर रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून दक्षिणेस सदर रस्त्याने गौसुल्वरा मशिदीच्या उत्तरेकडील पूर्व पश्चिम रस्त्यास मिळेपर्यंत तेथून पूर्वेस सदर रस्त्याने आश्रफ नगरमधील लेन नं. ८ ला मिळेपर्यंत, तेथून दक्षिणेस सदर लेन नं. ने कासा लिव्हिंग लोटस हाउसच्या उत्तरेकडील पूर्व पश्चिम रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून पूर्वेस सदर रस्त्याने चांद मशिदी जवळ भैरोबा नाल्यास मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस कोंढवा खुर्द व कोंढवा बुद्रुक यांच्या हद्दीस मिळेपर्यंत, तेथून पूर्वेस सदर हद्दीने NIBM रस्त्यास मिळेपर्यंत.
पुर्वः कोंढवा खुर्द व कोंढवा बुद्रुक यांची हद्द NIBM रस्त्यास जेथे मिळते तेथून दक्षिणेस NIBM रस्त्याने व पुढे दक्षिण पूर्वेस NIBM उंड्री रस्त्याने ट्युलीप व्हिलाच्या पश्चिमेकडील हद्दीस मिळेपर्यंत, तेथून दक्षिणेस सदर हद्दीने मौजे पिसोळीच्या उत्तरेकडील हद्दीस मिळेपर्यंत, तेथून पश्चिमेस मौजे पिसोळीच्या उत्तरेकडील हद्दीने (पुण्यधाम आश्रम रस्ता) मौजे कोंढवा बु. च्या पूर्वेकडील हद्दीस मिळेपर्यंत, तेथून दक्षिणेस मौजे कोंढवा बु. मौजे पिसोळी यांच्या हद्दीने व पुढे मौजे येवलेवाडी व मौजे पिसोळीच्या हद्दीने मौजे येवलेवाडीच्या दक्षिणेकडील मनपा हद्दीस मिळेपर्यंत.
दक्षिण: मौजे पिसोळी व मौजे येवलेवाडी गावाची सामाईक हद्द मौजे येवलेवाडीच्या दक्षिणेकडील मनपा हद्दीस जेथे मिळते, तेथून पश्चिमेस मौजे येवलेवाडीच्या दक्षिणेकडील मनपा हद्दीने मौजे गुजर निंबाळकर वाडी च्या पूर्वेकडील हद्दीस मिळेपर्यंत.
पश्चिमः मौजे येवलेवाडीच्या दक्षिणेकडील मनपा हद्द, मौजे गुजर निंबाळकरवाडीच्या पूर्वेकडील हद्दीस जेथे मिळते व मौजे गुजर निंबाळकरवाडी व मौजे येवलेवाडी यांच्या सामायिक हद्दीने व पुढे उत्तरेस मौजे गुजर निंबाळकर वाडी व मौजे कात्रज यांच्या सामाईक हद्दीने व पुढे नाल्याने कात्रज तलावाच्या शेजारील आंबील ओढ्यास मिळेपर्यंत तेथून उत्तरेस आंबील ओढ्याने कात्रज कोंढवा रस्ता ओलांडून अष्टविनायक विहार सोसायटीच्या पश्चिमेकडील हद्दीस मिळेपर्यंत तेथून उत्तरेस सदर हद्दीने राजस सोसायटी मधील पूर्व पश्चिम रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून पूर्वेस सदर रस्त्याने लेन नं. १८ ओलांडून भालचंद्र बंगल्याच्या दक्षिणेकडील हद्दीने व पुढे उत्तरेस भालचंद्र बंगल्याच्या पूर्वेकडील रस्त्याने आदीनाथ विहार इमारतीच्या दक्षिणेकडील रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून पूर्वेस सदर रस्त्याने आदीनाथ विहारच्या पूर्वेकडील रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस सदर रस्त्याने व रस्त्याच्या सरळ रेषेने उत्तरेस व पुढे मनपा उद्यानाच्या पूर्वेकडील रस्त्याने सागर इंडस्ट्रीच्या दक्षिणेकडील हद्दीस मिळेपर्यंत तेथून पूर्वेस सदर हद्दीने अरिहंत रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस अरिहंत रस्त्याने हिरा प्लास्टिक इंडस्ट्रीच्या दक्षिणेकडील हद्दीस मिळेपर्यंत, तेथून पूर्वेस सदर हद्दीने गल्ली नं.३१ ला मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस सदर गल्ली क्र. ३१ ने (मानसी अपार्टमेंटचा पूर्वेकडील रस्ता) सुखसागर नगर रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून पश्चिमेस सदर रस्त्याने सीमा सागर सोसायच्या पश्चिमेकडील हद्दीच्या सरळ रेषेस मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस सदर सरळ रेषेने मौजे कात्रज व मौजे बिबवेवाडीच्या हद्दीस मिळेपर्यंत.

PMC Ward 40 – Kondhwa Budruk Yevalewadi Map
COMMENTS