Modern College Pune | मनीषा मांढरे यांची नीट मधील नियुक्तीशी कॉलेजचा संबंध नाही | मॉडर्न कॉलेज कडून करण्यात आला खुलासा 

Homeadministrative

Modern College Pune | मनीषा मांढरे यांची नीट मधील नियुक्तीशी कॉलेजचा संबंध नाही | मॉडर्न कॉलेज कडून करण्यात आला खुलासा 

Ganesh Kumar Mule May 19, 2026 8:25 AM

Shailesh Tilak | शैलेश टिळक यांनी भूमिका केली स्पष्ट| आता भाजप काय निर्णय घेणार?
PMC Recruitment Exam Result | पुणे महापालिकेकडून घेण्यात आलेल्या या परीक्षांचे निकाल जाहीर | १७ ऑक्टोबर ला कागदपत्रांची छाननी  | जाणून घ्या सविस्तर 
PMC Administrative Officer | प्रशासन अधिकाऱ्याला सहायक आयुक्त पदाचा देण्यात आला पदभार! | लेखनिकी संवर्गाला न्याय मिळत असल्याची कर्मचाऱ्यांची भावना!

Modern College Pune | मनीषा मांढरे यांची नीट मधील नियुक्तीशी कॉलेजचा संबंध नाही | मॉडर्न कॉलेज कडून करण्यात आला खुलासा

 

NEET Paper Leak – (The Karbhari News Service) – पुण्यातील मॉडर्न कॉलेज मधील प्राध्यापिका मनीषा मांढरे यांचा नीट पेपर फुटीत सहभाग असल्याचे समोर आले आहे. मात्र यावरून कॉलेज चांगलेच अडचणीत आले आहे. त्यामुळे आता कॉलेज कडून याबाबत खुलासा करण्यात आला आहे. (Manisha Mandhare pune News)

कॉलेज कडून जारी करण्यात आलेल्या निवेदन नुसार  पुण्यातील मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय (स्वायत्त) येथील कनिष्ठ विभागातील शिक्षिका  मनीषा गुरुनाथ मांढरे या सन २००२ पासून महाविद्यालयात कार्यरत असून गेली २४ वर्षे इयत्ता ११ वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांना जीवशास्त्र विषयाचे अध्यापन करीत आहेत.

त्यांचा अध्यापनातील अनुभव लक्षात घेऊन National Testing Agency (NTA) मार्फत NEET परीक्षेसंदर्भातील काही गोपनीय कामकाजासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. ही नियुक्ती विषयी संस्था व मॉडर्न महाविद्यालयाचा दूरान्वये संबंध नाही. त्यांचे कार्य पूर्णतः गोपनीय स्वरूपाचे असून संबंधित व्यक्ती आणि NTA यांच्यामधील पत्रव्यवहार व सूचना थेट श्रीमती मनीषा मांढरे यांना देण्यात येत होत्या. त्यामुळे या प्रक्रियेशी महाविद्यालय प्रशासन अथवा संस्थेचा दूरान्वये संबंध नाही. असे कॉलेज प्रशासनाने म्हटले आहे.

मांढरे यांना NEET २०२६ प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणात अटक झाल्याची माहिती प्रसारमाध्यमांद्वारे समोर आली असून ही बाब अत्यंत गंभीर, दुर्दैवी व निंदनीय आहे. अशा प्रकारच्या घटना शिक्षण क्षेत्राच्या प्रतिमेला बाधा पोहोचविणाऱ्या आहेत.

संस्था व महाविद्यालय स्तरावर गांभीर्याने दखल घेत  मनीषा गुरुनाथ मांढरे यांच्या संदर्भात सोमवार, रोजी संस्थेच्या नियामक मंडळाची तातडीची बैठक घेऊन  मनीषा गुरुनाथ मांढरे यांच्यावर नियमानुसार निलंबनाची कारवाई करून त्यांना अटक झालेल्या दिनांकापासून (शनिवार, दि. १६/०५/२०२६ पासून) व वेळेपासून महाविद्यालयाच्या सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

मनीषा गुरुनाथ मांढरे यांच्या निलंबनाबाबत शिक्षण आयुक्त, शिक्षण आयुक्त कार्यालय, पुणे, मा. उपसंचालक, शालेय शिक्षण विभाग, पुणे व  सहसंचालक, शालेय शिक्षण विभाग, पुणे यांना कळविण्यात आले आहे. तसेच या संदर्भातील पुढील चौकशी सीबीआय च्या सहकार्याने करण्यात येईल. असे प्रशासनाने म्हटले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: